ETV Bharat / city

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फोटो व्हायरल करून अपप्रचार; तक्रार दाखल - loksabha2019

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फोटो एडीट करून समाजमाध्यमावर प्रसारित केला, अशी तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखा ताई ठाकूर फोटो प्रकरणावर माहिती देताना
author img

By

Published : Apr 28, 2019, 7:41 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी काही तास उरले असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार एकमेकांविषयी उपप्रचार करताना दिसत आहे. ईशान्य मुंबईतील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फोटो एडीट करून समाजमाध्यमावर प्रसारित केला, अशी तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीचा निवडणूक प्रचार शनिवारी सांयकाळी संपला. त्यामुळे उमेदवार समाज माध्यमांवर आपला प्रचार गुप्तपणे करत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांचा फोटो एडीट करून प्रसारित केला, अशी तक्रार आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखा ताई ठाकूर यांनी केली आहे.

आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखा ताई ठाकूर फोटो प्रकरणावर माहिती देताना

हा प्रकार मनोज कोटक यांनीच केला आहे, असा आरोप ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केला. समाजातील आणि बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मुलुंड पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. यावेळी मनोज कोटक यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जो कोणी हा फोटो एडिटिंग करून प्रसारित केला त्यावर पोलीस प्रशासनाने लवकर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सुमेध कुशलवर्धन मुंबई समन्वयक वंचित आघाडी, ईश्वर शिंदे भांडुप, विकास पवार सरचिटणीस मुंबई, आनंद जाधव मुंबई अध्यक्ष उपस्थित होते.

Intro:ईशान्य मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा फोटो व्हायरल प्रकरणी युतीचे उमेदवार मनोज कोटक विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार.

2019 लोकसभा निवडणूक मतदान काही तासांवर असताना निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार एकमेकांचे फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमावर पसरवून अपप्रचार करतात .आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी फोटो एडिटिंगची मदत घेत असतात .असाच प्रकार ईशान्य मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांच्या बाबतीत घडला आहे. ईशान्य मुंबईतील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी निहारिका खोंदले यांचा फोटो एडिटिंग करून समाजमाध्यमावर प्रसारित करून अपप्रसार केला आहे. अशी तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात आज देण्यात आली आहे.Body:ईशान्य मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा फोटो व्हायरल प्रकरणी युतीचे उमेदवार मनोज कोटक विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार.

2019 लोकसभा निवडणूक मतदान काही तासांवर असताना निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार एकमेकांचे फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमावर पसरवून अपप्रचार करतात .आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी फोटो एडिटिंगची मदत घेत असतात .असाच प्रकार ईशान्य मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांच्या बाबतीत घडला आहे. ईशान्य मुंबईतील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी निहारिका खोंदले यांचा फोटो एडिटिंग करून समाजमाध्यमावर प्रसारित करून अपप्रसार केला आहे. अशी तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात आज देण्यात आली आहे.

निवडणूक प्रचार काल सांयकाळी संपला असल्याने उमेदवार समाजमाध्यमवार आपला प्रचार गुपित करीत असतात. ईशान्य मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांचा फोटो प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आंबेडकर भवन दादर येथे भेटीदरम्यान काढण्यात आला होता. तो फोटो भाजप च्या आयटी सेल ने मनोज कोटक यांना प्रकाश आंबेडकर आसनस्थ असलेल्या जागी बसवून उमेदवार निहारिका खोंदले यांच्याशी बातचीत करीत आहेत असे भासवले असल्याने हा अपप्रचार थांबवला पाहिजे यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखा ताई ठाकूर यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात उमेदवार मनोज कोटक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.आणि हा प्रकार मनोज कोटक यांनीच केला आहे असा आरोप ठाकूर यांनी माध्यमांना बोलताना केला आहे. यावेळी समाजातील आणि बहुजन वंचित आघाडी चे कार्यकर्ते मोठया संख्येने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी मनोज कोटक निषेधार्थ कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली.आणि लवकरात लवकर जो कोणी हा फोटो एडिटिंग करून प्रसारित केला आहे. त्यां वर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुमेध कुशलवर्धन मुंबई समन्वयक वंचित आघाडी, ईश्वर शिंदे भांडुप ,विकास पवार सरचिटणीस मुंबई, आनंद जाधव मुंबई अध्यक्ष उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.