मुंबई - मुंबई मेट्रोचे कारशेडचा तिढा अजूनही सुटलेला नाही. हा तिढा सुटावा यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती मुंबई मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो मार्गिका तीन, चार आणि सहा या तीन मेट्रो मार्गिकांच्या एकत्रित कार डेपो करता ही समिती अभ्यास करणार असून एका महिन्यात समितीला राज्य सरकारला अहवाल सादर करावा लागणार आहे.
मुंबई मेट्रो मार्गिका-३, ४ व ६ या तीन मेट्रो मार्गिकांच्या एकत्रित कार डेपो करीता तसेच मार्गिका-६ व प्रस्तावित मार्गिका-१४ च्या स्थानकासाठी कांजुरमार्ग जागा योग्य आहे. एकत्रित डेपो असल्यामुळे स्वतंत्र प्रकल्पांच्या डेपोकरिता लागणारी जमीन व तिच्या अधिग्रहण खर्चामध्ये तुलनेने मोठया प्रमाणात बचत होऊ शकते, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा - गुजरातच्या मॉडेल तरुणावर ठाण्यात सामुहिक बलात्कार, तिघे ताब्यात
कांजुरमार्ग येथील जमिन न्यायप्रविष्ठ असून मा. उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश आणखी काही कालावधीसाठी लागू राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मेट्रो मार्गिका-३ व ६ प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर परिणाम होऊन प्रकल्प पूर्णत्वास विलंब होऊन प्रकल्प किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई मेट्रो मार्गिका-३.४ ५ ६ यांचे कार्यान्वयन नियोजन व स्थापत्य कामाची सद्य:स्थिती विचारात घेता, प्रकल्प अंमलबजावणीतील कालापव्यय व अतिरिक्त वित्तीय भार टाळणे तसेच प्रकल्पाची कार्यक्षमता व दीर्घकालिन नियोजन या दृष्टीकोनातून मेट्रो कारशेडसाठी पर्यायी सुयोग्य जागेची निक्षिती करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मेट्रो कारशेडकरिता पर्यायी जागा
उपलब्ध करण्यासाठी राज्यशासनाने ही समिती गठीत केली आहे.
सदर समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे असेल :
- आरे येथील यापूर्वी मेट्रो लाईन-३ च्या कारशेड डेपोकरिता प्रस्तावित केलेला आराखडा प्रकल्पाच्या डिझाईन कालावधीच्या गरजा पूर्ण करण्यास पुरेसा आहे किंवा कसे, अथवा त्या गरजा पूर्ण करण्याकरिता आगरखी जमिनीथी व परिणामी आणखी वृक्षतोश करण्याची आवश्यकता भासेल किंवा कसे, याबाबत तपासणी करणे.
- मेट्रो लाईन-३ व लाईन-६ या मार्गिकांचे सुलभरित्या एकत्रिकरण करणे शक्य आहे का, व यासाठी अंदाजित खर्च व कालावधी या बाबी तपासणे.
- कार्यक्षमतेतील फायदे व जनहित या बाबी विचारात घेता कांजुर मार्ग येथील जागा ही आरे येथील जागेपेक्षा अधिक सुयोग्य आहे किंवा कसे, याची तपासणी करणे.
- मेट्रो लाईन-३, लाईन ४ व लाईन-६ या मार्गिकांच्या डिझाइन कालावधीमध्ये या मार्गिकांवरील वाहतूक गरजा हाताळण्यासाठी कांजुरमार्ग येथील जागा पुरेशी व सुयोग्य आहे का, ही बाब तपासणे.
- सर्व अनुषंगिक मुद्दे व उपलब्ध पर्याय विचारात घेऊन मेट्रो प्रकल्पांची कार्यक्षमता व दिर्भकालीन नियोजन या दृष्टीकोनातून मेट्रो कारशेडसाठी सुयोग्य पर्यायी जागेची निशितीकरण्याकरिता शासनास शिफारस करणे.