ETV Bharat / city

Nalasfai Mumbai : नालेसफाईच्या कामाला असहकार्य करणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नोटीस द्या - पालिका आयुक्त

पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल ( Commissioner Iqbal Singh Chahal ) नालेसफाईच्या कामाची पाहणी ( Mumbai Nalasfai Inspection tour ) करत असताना उत्तर भारतीय संघ भवनासमोरील मिठी नदीतील उपसा ( Mithi river ) केलेला गाळ ठेवण्यासाठी मुंबई विद्यापीठाने जागा देण्यास नकार दिल्याचे समोर आले. नालेसफाई दरम्यान काढण्यात आलेला गाळ सुकवण्यास जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी डिजास्टर ऍक्टनुसार मुंबई विद्यापीठाला नोटीस ( Notice of BMC to Mumbai University ) द्या, असे आदेश आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

author img

By

Published : Apr 14, 2022, 10:33 PM IST

पाहणी करताना पालिका आयुक्त
पाहणी करताना पालिका आयुक्त

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. पावसाचे पाणी साचू नये म्हणून नालेसफाईचे काम महत्वाचे आहे. या कामाला सहकार्य न केल्याने डिजास्टर ऍक्टनुसार कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच १५ मे पूर्वी गाळ काढण्याच्या तसेच अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. आज (गुरुवारी) पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल ( Commissioner Iqbal Singh Chahal ) नालेसफाईच्या कामाची पाहणी ( Mumbai Nalasfai Inspection tour ) करत असताना उत्तर भारतीय संघ भवनासमोरील मिठी नदीतील उपसा ( Mithi river ) केलेला गाळ ठेवण्यासाठी मुंबई विद्यापीठाने जागा देण्यास नकार दिल्याचे समोर आले. नालेसफाई दरम्यान काढण्यात आलेला गाळ सुकवण्यास जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी डिजास्टर ऍक्टनुसार मुंबई विद्यापीठाला नोटीस ( Notice of BMC to Mumbai University ) द्या, असे आदेश आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

'१५ मेपर्यंत सर्व गाळ काढा' : नालेसफाईच्या कामाला १५ दिवस उशीर झाला असला तरी या कामाला आता वेग आला आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून ८ तास ऐवजी १६ तास म्हणजे दोन शिफ्टमध्ये करण्याचे, मशिनरी वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंत्राटदारांना तीन टप्प्यात काम दिले आहे. जो कंत्राटदार मे महिन्याच्या सुरुवातीला ५० टक्के गाळ काढणार नाही, त्याला पुढील दोन टप्प्याचे काम दिले जाणार नाही. ते काम इतर कंत्रादाराकडून करून घेतले जाईल, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहे.

'अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी करा' : नाले सफाईच्या कामावर नगरसेवकांचे लक्ष असायचे. सध्या पालिकेचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक काम बघत आहे. नालेसफाईच्या कामावर देखरेख ठेवता यावी, म्हणून अधिकाऱ्यांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. त्याचबरोबर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनीही नालेसफाईच्या कामाची पहाणी करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

'या' नाल्यांची केली पाहणी : नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी आज बीकेसी कनेक्टर ब्रिज, वाकोला नाला, वांद्रे स्थानकाजवळील चमडावाला नाला, बीकेसी येथील धीरुभाई अंबानी स्कूल जवळील नाल्यांची पाहणी आयुक्तांनी केली.

हेही वाचा - BMC Water For All Policy : समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी 'वॉटर फॉर ऑल पॉलिसी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.