ETV Bharat / city

CM Eknath Shinde: ..बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळेच! गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमिवर काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? वाचा, सविस्तर

शिवसेचे 40 अन् अपक्ष 10 असे 50 आमदार घेऊन बाहेर पडलले शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. ( Commentary of CM Shinde On Gurupournima ) त्यानंतर सध्या राज्यात राजकीय वादळ आल्याची स्थिती आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमिवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यावेळी अनेक विषयांवर माध्यमांशी संवाद साधला आहे.

एकनाथ शिंदे यांचे बाळासाहेबांना अभिवादन
एकनाथ शिंदे यांचे बाळासाहेबांना अभिवादन
author img

By

Published : Jul 13, 2022, 8:26 PM IST

Updated : Jul 13, 2022, 8:49 PM IST

मुंबई - आज गुरु पौर्णिमा. राजकीय दृष्ट्या शिवसेनेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी गुरु पौर्णिमेला अनेक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत असतात. ( Eknath Shinde On Balasaheb Thackery ) मात्र, पहिल्यांदाच शिवसेनेत एवढी मोठी फूट पडल्याने जवळपास अर्धा पक्ष रिकामा झालेला आहे. अशी परिस्थिती असताना बंडखोर गटाकडून वारंवार बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जात आहे. आज बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना अभिवादन केले व माध्यमांशी संवाद साधला.

बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच - यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या स्मृतीस्थळावर येत असतो. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच एक साधा कार्यकर्ता शिवसैनिक आज मुख्यमंत्री म्हणून काम करतोय. त्यांच्या आशीर्वादामुळेच मला ही संधी मिळाली. त्यामुळे बाळासाहेबांची शिकवण आणि त्यांचा विचार पुढे नेण्याचा मी आणि माझ्यासोबतचे सर्व 50 आमदार पूर्ण प्रयत्न करू. बाळासाहेबांनी प्रत्येक मराठी हिंदू माणसाला आणि त्यांच्या हिंदुत्वाला ताठ मानेने जगण्याची शिकवण दिली. त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही बाळासाहेबांचे हे विचार महाराष्ट्रात पुढे नेतोय."

बाळासाहेब आमच्या पाठीशी - पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने बनलेले सरकार आहे. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करेल. शेतकरी, कष्टकरी, वारकरी या सर्वांचा सर्वांगीण विकास आमचे सरकार करेल. या राज्याचा उत्कर्ष आणि प्रत्येक माणसाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठीच आज आम्ही सर्वांनी बाळासाहेबांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. मला खात्री आहे बाळासाहेब आमच्या पाठीशी आहेत."

सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा - राज्यातील पूरस्थिती बाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मी आज सकाळपासूनच राज्यातील सर्व जिल्ह्यात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहे. त्यांच्याशी सतत चर्चा करतोय. काही ठिकाणी पूर परिस्थितीला धरणाचे दरवाजे उघडणे हे देखील कारणीभूत ठरतात. त्यामुळे याबाबत देखील माझी धरण परिसरातील अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. कोणत्या वेळी दरवाजे उघडले जातील कोणत्या वेळी बंद केले जातील याबाबत सर्व चर्चा झालेली आहे."

त्वरित मदत पोहोचेल - "राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सर्व यंत्रणा अलर्ट आहे. राज्यात कुठलीही दुर्घटना घडू नये अशाच प्रकारची सर्व तयारी आमची झालेली आहे. मात्र, एखादी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी त्वरित मदत कार्य पोहोचवण्यासाठी देखील एसडीआरएफ, एनडीआरएफ सोबतच आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत देखील या ठिकाणी त्वरित पोहोचेल. अशी सर्व यंत्रणा सध्या कार्यरत आहे." अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा - शिवसेनेचा ताक फुकून पिण्याचा निर्णय! मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने खासदारांचे बंड थांबणार का? वाचा, सविस्तर

Last Updated : Jul 13, 2022, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.