मुंबई - रोजच्या इंधन दरवाढीमुळे सध्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसत आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने या इंधनावरील वॅट कमी करण्यात आला होता. यामुळे कुठे थोडा दिलासा मिळाला होता न होता तेच आता केंद्राने नॅचरल गॅस विक्री किमतीत 110 टक्क्यांची वाढ केल्याने सीएनजीच्या ( Compressed Natural Gas ) किमतीत पुन्हा एकदा 5 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र गॅस लिमिटेडची घोषणा - महाराष्ट्र गॅस लिमिटेडने या संदर्भात घोषणा करताना सांगितले आहे की, "वाहनांच्या इंधन दरात सतत वाढ होत असल्याने गॅस टँकर दळणवळणात मोठा खर्च येत आहे, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हे दर वाढवावे लागत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गॅस लिमिटेडच्या वतीने ( Maharashtra Gas Limited ) देण्यात आली.
नॅचरल गॅस विक्री किमतीत 110 टक्क्यांची वाढ - देशात उत्पादित होणाऱ्या नॅचरल गॅसच्या किमतीत केंद्र सरकारने तब्बल 110 टक्क्यांनी वाढ केली. यामुळे सीएनजीच्या किंमतीत 5 रुपयांची तर पीएनजीच्या ( Piped Natural Gas ) किमतीत 4.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या किंमतीनुसार सीएनजीची नवी किंमत 72 रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे.
प्रवासी भाडे वाढण्याची शक्यता - सध्या प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या रिक्षा असो किंवा टॅक्सी असो या सीएनजीवर चालत आहेत. पण, या सततच्या इंधन दरवाढीमुळे या प्रवासी भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
हेही वाचा - Dr. Babasaheb Ambedkar Memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे काम धीम्या गतीने