ETV Bharat / city

CM On Competitive Exam Age : कोरोना काळात कमाल वयोमर्यादा ओलांडली; नो टेन्शन, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा - सरळ सेवा परीक्षा वयोमर्यादा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरल्यानंतर जनजीवन ठप्प झाले. तब्बल दोन वर्षांनी कोरोना आटोक्यात येत आहे. मात्र शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिध्द झाली नव्हती. त्यामुळे शासकीय सेवेत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. त्यामुळे आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर निर्णय घेऊन स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा ( CMs Relief to Competitive Exam Candidates ) दिला आहे.

CM On Competitive Exam Age
स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
author img

By

Published : Dec 18, 2021, 7:13 AM IST

मुंबई - कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल मर्यादा ओलांडली आहे. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून अशा सर्व उमेदवारांना स्पर्धा परिक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्य शासनाने यासंदर्भातील शासन निर्देश जारी ( CM On Competitive Exam Age ) केला आहे.

उमेदवारांना दिलासा -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरल्यानंतर जनजीवन ठप्प झाले. तब्बल दोन वर्षांनी कोरोना आटोक्यात येत आहे. मात्र शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिध्द झाली नव्हती. त्यामुळे शासकीय सेवेत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. त्यामुळे आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून १ मार्च २०२० ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीत भाग घेता येणार आहे.

नवीन अर्ज भरता येणार -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या होत्या. त्या जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक, या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल, अशा प्रकरणी देखील ०१ मार्च, २०२० ते या कालावधीत संबंधित पदाचा सेवाप्रवेश शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरीता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी देखील हा नियम लागू होईल.

परीक्षा न झालेल्यांना देखील संधी -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी देखील दि. ०१ मार्च, २०२० पासून शासनाने नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने "एक वेळची विशेष बाब" म्हणून परवानगी द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा - Shivsena Agitation Kolhapur : कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; कोल्हापुरात पडसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.