मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुमारे ४,००० पोस्टकार्ड असलेले कुरिअर केले ( CM Uddhav Thackeray sends postcards to President ) आहे. त्यांनी हे पोस्टकार्ड पाठवून मराठीला 'अभिजात भाषेचा' दर्जा देण्याची मागणी केली आहे. पोस्टकार्डचा हा दुसरा टप्पा होता. पहिल्या वेळी 6,000 पोस्टकार्डचा एक कुरिअर याच प्रस्तावासाठी पाठवण्यात आले होते. राज्यभरातील सेलिब्रिटीं ते सर्वसामान्य लोकांसह गेल्या काही महिन्यांत राष्ट्रपतींना 125,000 हून अधिक पोस्टकार्ड पाठवले आहेत.
डिसेंबरमध्ये पहिले पोस्टकार्ड -
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रपतींना पहिले पोस्टकार्ड सादर केले होते. त्यावर मराठीत स्पष्ट अक्षरात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असे लिहिलेले होते. त्यानंतर जनसामान्यांनीही राष्ट्रपतींना लेटेरकार्ड पाठवण्यास सुरुवात केली होती.
'अभिजात मराठी जन अभियान'
मुख्यमंत्र्यांसोबत मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई आणि मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत होते. त्यांनी 'अभिजात मराठी जन अभियान' असे घोषवाक्य असलेले पोस्टकार्ड असलेली भेटपेटी पाठवण्यासाठी मंजुरी दिली होती.
महाविकास आघाडी सरकारला आशा -
या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. कारण राज्यात २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा दिन' साजरा केला जाणार आहे आणि तोपर्यंत केंद्र राज्याच्या भाषेला योग्य दर्जा देईल अशी आशा सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला आहे.
केवळ सहा भाषांना दर्जा -
आजपर्यंत केवळ सहा भारतीय भाषांना अधिकृतपणे दर्जा देण्यात आलेला आहे. संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि ओडिया यांना विविध नियमांवर दर्जा दिलेला आहे.