ETV Bharat / city

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

author img

By

Published : Oct 15, 2021, 5:09 PM IST

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी डॉ. कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी डॉ. कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

'माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. देशप्रेमासोबतच, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेच राहील. विचार प्रवण पिढी घडवण्यासाठी वाचन उपयुक्त ठरते. त्यासाठी त्यांचा पुस्तकांवर प्रेम करा हा संदेश महत्वाचा आहे. त्यांच्या जयंती निमित्त साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्याही सर्वांना शुभेच्छा,' असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन
मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन

मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन

कलाम यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयात आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलींद गवादे यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन केले. पुढच्या पिढ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून सशक्त समाज उदयास यावा, अशी अपेक्षा श्री. गवादे यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होण्यास मदत होईल, यासाठी नव्या पिढीने वाचनाची आवड आवर्जून जोपासणे गरजेचे आहे. वाचन प्रेरणा दिनातून आणि डॉ. कलाम यांच्या व्यक्तीमत्त्वातून सर्वांना निश्चितच प्रेरणा मिळेल, असेही गवादे म्हणाले. समर्थ रामदासस्वामी रचित करुणाष्टकांचे यावेळी अभिवाचन करण्यात आले. मराठी भाषा विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध पुस्तकांतील उताऱ्यांचे अभिवाचन केले. सर्वांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.