ETV Bharat / city

कोविड लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; सर्व अधिकारी राहणार उपस्थित

author img

By

Published : Apr 29, 2021, 12:02 PM IST

वर्षा निवासस्थानी समिती कक्षात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आदी, सर्व पालकमंत्री आदी मंत्री यावेळी उपस्थित राहतील.

कोविड लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मुंबई - राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज वर्षा निवासस्थानी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन आणि मोफत दिल्या जाणाऱ्या कोविड लसींबाबतही यावेळी चर्चा होणार आहे.

वर्षा निवासस्थानी समिती कक्षात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आदी, सर्व पालकमंत्री आदी मंत्री यावेळी उपस्थित राहतील.

संसर्गाचा आलेख वाढतोय

राज्यात बुधवारी ६३ हजार ३०९ कोरोना बाधित रुग्ण सापडले. पैकी ९८५ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी राज्यात संचारबंदी आहे. तरीही रुग्णवाढीचा आलेख वाढतो आहे. मुंबई, ठाणे, पुणे भागात रुग्ण संख्येत मोठी घट झाल्याचे दिसते. परंतु, ग्रामीण भागात विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे दिसून येते. इतर जिल्ह्यातील स्थिती वेगळी नाही. पुढील १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याबाबत बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.

मोफत लस, लॉकडाऊनबाबत होणार चर्चा

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, १८ ते ४४ वयोगटापर्यंत राज्य सरकारकडून मोफत दिल्या जाणाऱ्या लसींबाबत चर्चा केली जाईल. जिल्ह्यातील लोकसंख्या आणि त्या तुलनेत लागणारे डोस, जिल्ह्यांची मागणी, जिल्हा स्तरावर लसीकरणाची व्यवस्था कुठे आणि कशी असेल, पॅरामेडिकल स्टाफला प्रशिक्षण आदी विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे सूचना देतील. तसेच लॉकडाऊन वाढवण्यात येणार असून जिल्ह्याच्या ठिकाणी काटेकोरपणे नियमांचे पालन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देणार असल्याचे समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.