ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला पुन्हा सुरुवात; २१ ऑगस्टपासून नंदुरबार येथून दुसरा टप्पा - आमदार सुरजसिंह ठाकूर

राज्यातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली. सद्यस्थितीत महापूर ओसरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाजनादेश यात्रेला सुरुवात करत आहेत. येत्या २१ ऑगस्टला नंदुरबार येथून यात्रेला सुरुवात होणार आहे.

महाजनादेश यात्रा
author img

By

Published : Aug 17, 2019, 8:42 PM IST

मुंबई - राज्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला स्थगिती दिली होती. तसेच भाजपकडून पूरग्रस्तांचा आढावा देखील घेण्यात आला होता. सद्यस्थितीत महापूर ओसरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाजानदेश यात्रेला सुरुवात करत आहेत. येत्या २१ ऑगस्टला नंदुरबार येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्हे, ५१ विधानसभा आणि १३६९ किमी अंतराचा प्रवास झाला असल्याची माहिती यात्रेचे प्रमुख आमदार सुरजसिंह ठाकूर यांनी दिली. या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचा नंदुरबार ते सोलापूर हा दुसरा टप्पा राहणार आहे.

महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा ११ दिवसाचा आहे. यामध्ये १४ जिल्ह्यातून ५५ विधानसभा आणि १८३९ किमी अंतराचा प्रवास असेल. आधीच्या नियोजनानुसार महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला सुरू होणार होता. मात्र आता यात्रेच्या वेळापत्रकात बदल करून २१ ते ३१ ऑगस्ट या दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर तर विदर्भातील बुलडाणा या जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या एकूण १४ जिल्ह्यातील ५५ विधानसभा मतदारसंघातून तब्बल १ हजार ८३९ किमीअंतराचा प्रवास होणार असल्याचे सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.

गडचिरोलीत मुक्कामी राहणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री-

फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात १ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून झाली. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पहिला टप्पा ९ ऑगस्टला नंदुरबार येथे संपणार होता. मात्र राज्यातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे तीन दिवस आधीच महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस हे सरकारच्या पाच वर्षाच्या कामांचा लेखाजोखा राज्याच्या जनतेसमोर जाऊन मांडणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे. अनेक ठिकाणी यात्रेच्या नियोजनात जिथे केवळ स्वागत होते तिथे सभा घ्याव्या लागल्या. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात रात्रीचा मुक्काम करणारे फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली.

Intro:मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला पुन्हा सुरुवात , २१ ऑगस्ट पासून नंदुरबारलापासून दुसरा टप्पा....

मुंबई १७

राज्यात उदभवलेल्या पूरस्तिथीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वतीने सुरु केलेली महाजानदेश यात्रा मध्यावर सोडून पुरग्रस्तांचा आढावा घेतला होता . आता पूरस्तिथी सावरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा महाजानदेश यात्रेला सुरुवात करत आहेत . येत्या २१ ऑगस्टला मुख्यमंत्री नंदुरबार इथून यात्रेला सुरुवात करणार आहेत . महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्हे, ५१ विधानसभा आणि १३६९ कि. मी. अंतराचा प्रवास झाला असल्याची माहिती या यात्रेचे प्रमुख आमदार सुराजसिंह ठाकूर यांनी दिली . महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचा नंदुरबार ते सोलापूर हा दुसरा टप्पा आहे .

महाजानदेश यात्रेच्या ११ दिवसांच्या दुस-या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा १४ जिल्ह्यातून ५५ विधानसभा आणि १८३९ कि. मी. अंतराचा प्रवास असेल. आधीच्या नियोजनानुसार महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरू होणार होता. मात्र आता यात्रेच्या वेळापत्रकात बदल करून २१ ते ३१ ऑगस्ट, नंदुरबार ते सोलापूर या दुस-या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर, विदर्भातील बुलढाणा, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १४ जिल्ह्यातील ५५ विधानसभा मतदारसंघातून १८३९ कि. मी. अंतराचा प्रवास होणार असल्याचे यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.

फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा १ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी येथून भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व संरक्षण मंत्री मा. राजनाथसिंगजी, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. हा टप्पा ९ ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे संपणार होता. मात्र राज्यातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे तीन दिवस आधीच महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कामांचा राज्याच्या जनतेसमोर जाऊन लेखाजोखा मांडणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असून अनेक ठिकाणी यात्रेच्या नियोजनात जिथे केवळ स्वागत होते तिथे स्वागत सभा कराव्या लागल्या विशेष म्हणजे गडचिरोलीत रात्रीचा मुक्काम करणारे फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत अशी माहितीही ठाकूर यांनी दिलीBody:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.