ETV Bharat / city

CM Eknath Shinde : राज्यातील मंदावलेल्या मुख्य प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांना द्यावी लागणार गती!

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ठाकरे सरकारने हाती घेतलेले प्रकल्प धिम्यागतीने सुरू झाले. कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, शिवडी ते न्हावा - शेवा प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या कामाला गती देण्याचे काम नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना करावे लागणार आहे. अशी अपेक्षा जनमाणसातून व्यक्त करण्यात येत आहे.

CM Eknath Shinde
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jul 1, 2022, 4:52 PM IST

मुंबई - उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खेचत, महाविकास आघाडीला दणका देत एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर राज्याचा कारभार सोपवला असून कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांत वेग मंदावलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी झडझडून काम करावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांना प्रामुख्यांने

या प्रकल्पावर काम करण्याची अपेक्षा - राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री पदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्णी लागली. उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारताच अवघ्या दोन महिन्यांत कोरोनाचे महासंकट आले. संपूर्ण जगातील व्यवहार ठप्प झाले. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत पहिली लाट वर्षभरात नियंत्रणात आणण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. एकापाठोपाठ एक अशा तीन लाट धडकल्या. मात्र, दुसरी लाट ओसरल्यानंतर सरकारने हाती घेतलेले प्रकल्प धिम्यागतीने सुरू झाले. कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, शिवडी ते न्हावा - शेवा प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या कामाला गती देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावे लागणार आहे.

जलशिवार - विरोधी पक्षनेते आणि राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील जलशिवार योजना चौकशीच्या फेऱ्यात आहे. काही ठिकाणी झालेल्या कामांतील अनियमिततेचा ठपका ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा प्रकल्प असून तो मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशिल असतील. तर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना नव्याने सुरु करण्याचे निर्देश फडणवीसांनी दिली.

वॉटर ग्रीड - पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी, या भुमिकेतून वॉटर ग्रीड पाईपलाईन ही संकल्पना पुढे आली. भविष्यात यातून मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे राज्यभरात ही योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन यासाठी मोलाचे असणार आहे.

हाय स्पीड रेल्वे मार्ग - मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुह्र्द्यसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग सुरु केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैद्राबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल.

समृद्धी महामार्ग - देशातील सर्वाधिक मोठा आणि राज्याचा महत्वाकांक्षी सुपरफास्ट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे काम मंदावले होते. मात्र आता या कामाला वेग आला असून आतपर्यंत जवळपास पूर्ण झाले आहे. शिर्डीपर्यंत सुमारे ५०० किलोमोटर लांबीचे काम पूर्णत्वास आले आहे. या महामार्गामुळे सात तासांत पूर्ण करता येणार आहे. यापूर्वी नागपूर ते मुंबई अंतर कापण्यास १२ ते १४ तासांचा अवधी लागत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण करणे हे ध्येय असणार आहे.

बुलेट ट्रेन - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा दोन-तृतीयांश भाग गुजरातेत असूनही महाराष्ट्राच्या वाट्याला निम्मा खर्च येणार आहे. महाराष्ट्रातून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. राज्यातील भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील बुलेट ट्रेनचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मार्गी लावावे लागेल, अशी संभवना व्यक्त करण्यात येत आहे.

मेट्रो कारशेड - मुंबई येथील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वेची जाळे उभारली जात आहे. या मेट्रोच्या कारशेड साठी जागेवरून वाद सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित केली होती. सध्या जागेवरून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. हा वाद सोडवून सर्वसमावेशक भूमिका घेत कारशेड उभारणीला गती देण्याची मुख्य जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पेलावी लागणार आहे. त्यांनी याबाबतचा निर्णय पहिल्याच बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

हेही वाचा - Aarey Car Shed : मुख्यमंत्री शिंदेंच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.