मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे आणि मराठवाड्यातील सामान्य जनतेतून आलेले नेते शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी ते येत असताना मुंबई जवळ एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीने टक्कर दिल्यामुळे अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू अपघात की घातपात या संदर्भात दिवंगत विनायक मेटे यांच्या आई आणि इतर नातेवाईकांनी तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी घातपात कि अपघात याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. त्या मागणी नुसार त्यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश आज मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत. मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती..त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची संपूर्ण चोकशी करण्यासाठी आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूमागे घातपात कि अपघात या संदर्भात सीआयडी चौकशी करून आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
हेही वाचा Patra Chawl Scam आता ईडीच्या निशाण्यावर कोण मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी