मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता ( Chief Justice Dipankar Datta ) यांची उच्च न्यायालयाच्या ( Bombay High Court ) दालनात भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या ( Local Body Elections ) संदर्भातील निकालानंतर ओबीसी आरक्षणाबाबत ( OBC Reservation ) जो राजकीय पेच महाविकास आघाडीच्या सरकारपुढे निर्माण झाला, त्याबाबत नेमका काय मधला मार्ग काढता येईल, याबद्दलची चर्चा झाल्याची शक्यता आहे. दुसरीकडे ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती, न्यायालय प्रशासनाने दिली आहे.
दीड तास चर्चा : मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तीमध्ये सुमारे दिड तास चर्चा झाली. मात्र, नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र समजू शकलेले नाही. खासदार संजय राऊत यांनी उघडपणे न्यायव्यवस्थेवर जी टीका केली होती. त्यासाठी वकील संघटनेने शिवसेना खासदारांसह, मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, यांच्याविरोधात अवमान केल्याबाबत कारवाईची मागणी करत जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरही मुख्यमंत्री आणि न्यायमूर्तींमध्ये चर्चा होऊ शकते, तशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे या आधीही मुख्य न्यायमूर्तींच्या भेेटीला आले होते. गतवर्षी 14 मे रोजी कोरोना संबंधित अन्य विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर न्या. दीपांकर दत्ता यांनीही सह्याद्री- वर्षा येथे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुटीपूर्वी शुक्रवारी मुख्यमत्र्यांनी न्यायमूर्तींची पुन्हा भेट घेतल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. मात्र ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगत अशा भेटी वरचेवर होत असतात, अशी माहिती न्यायालयीन प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा : CM's challenge : मुख्यमंत्र्यांचे आव्हान 14 तारखेला विरोधकांचा समाचार घेणार