मुंबई - कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ राज्यभर पाहायला मिळते. त्यामुळे राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे. खासकरून गर्दीच्या ठिकाणी जनतेने मास्क वापरावा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी केले आहे. आज ( गुरुवारी ) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( State Cabinet Meeting ) राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येबाबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेला मास्क वापरणे बाबत आवाहन केले आहे. राज्यात दर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाहिला तर 1.59 टक्के एवढा आहे. मात्र मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आढळतो.
सध्या राज्यांमध्ये केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून अठरा रुग्ण ऑक्सिजनवर आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मात्र अद्यापही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं आवश्यक असून, प्रत्येक नागरिकाने लस घेतलीच पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. सध्या राज्यामध्ये 18 पेक्षा अधिक वयाच्या 92.7 27 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आले आहे.
हेही वाचा - Washim : बचत गटांच्या आर्थिक सहकार्याने गावाची पाणी समस्येवर मात, महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू