मुंबई - अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या शिवसेनेचे दोन्ही दसरा मेळावे ( Dussehra Melawa ) आरोपांच्या फैरीनी गाजले. मुंबईमध्ये शिवतीर्थावर दसरा मेळावामध्ये स्वेच्छेने लोक पायी चालत आले. तर दुसऱ्या मेळावामध्ये भाडं-तोड, बस,लक्झरी सारख्या चार चाकी वाहन लावून माणसं आणले गेले; असा आरोप महाराष्ट्रभर विद्यार्थी, राजकीय पक्ष करत आहे. मात्र, या आरोपाची शाही वाळत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या गटाचा पहिला दसरा मेळावा ( Dussehra Melawa controversy ) वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे .
मेळाव्यामध्ये एकमेकांवर जोरदार आरोप - दोन्ही मेळाव्यामध्ये एकमेकांवर जोरदार प्रश्न उत्तर आणि आरोप केले गेले. दोन्ही नेत्यांनी आपापसात तीव्र वाक्बाण एकमेकांवर सोडल्याचे अवघ्या देशाने पाहिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत लाखोंची जनता असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं .त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला वारंवार सिद्ध कराव लागतं . की आम्हीच खरी शिवसेना मात्र येत्या काळात निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत तरी वाट पहावी लागणार आहे.
दसरा मेळाव्याची सभा वादात - मात्र ही संपूर्ण दसरा मेळाव्याची सभा वादात अडकलेली आहे .जेव्हा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला येथून थेट प्रक्षेपित होत होता. तर तो मेळावा थेट पश्चिम रेल्वेच्या एका लोकल ट्रेन मधल्या स्क्रीनवर लाईव्ह दाखवला गेला. जाणकार नागरिकांनी त्याचे फोटो काढून ते व्हायरल केले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली."भारत सरकारने रेल्वे मंत्रालयाने हा आदेश दिला होता की पश्चिम रेल्वे महामंडळाने हे लाईव्ह सभा केली होती असा प्रश्न यांनी शासनाला केलाय. तसेच पश्चिम रेल्वेच्या महामंडळाने सर्वोच्च स्तरावर याची तात्काळ चौकशी करून ज्या कोणी अधिकाऱ्याच्या कर्तव्य अंतर्गत हे झालेले आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावी अशी, मागणी देखील ईटीवी सोबत संवाद साधताना त्यांनी केली आहे.
चौकशीचे आदेश - पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी ईटीव्ही द्वारे संवाद साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला . ''मात्र बीकेसी येथील मेळाव्याच्या जाहीर सभेसाठी रेल्वे अधिकारी द्वारा कोणीही परवानगी दिली नाही . तसेच ज्यांनी कुणी हे कृत्य केले आहे . त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत ; अशी माहिती त्यांनी दिली . तसेच सभा लाईव्ह १५ मिनिटे चालली . मात्र हि बाब लक्षात येताच ताबडतोब ते थांबवण्यात आले. हि बाब देखील अधोरेखित केली.