ETV Bharat / city

Corona Home Testing Kit : होम टेस्टिंग किट चाचणी गैर नाही, पण रिपोर्ट अपलोड करा - डॉ. मंगला गोमारे

एखाद्याला लक्षणे असतानाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास रुग्णांनी आरटीपीसीआर चाचणी ( RTPCR Test ) करून घ्यावी. जेणे करून त्या रुग्णांवर योग्य उपचार करणे शक्य होत असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे ( Chief Executive Health Officer Mangala Gomar ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

Corona Home Testing Kit
Corona Home Testing Kit
author img

By

Published : Jan 16, 2022, 5:29 PM IST

Updated : Jan 16, 2022, 5:46 PM IST

मुंबई - होम टेस्टिंग किटचा ( Home Testing Kit ) वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्याचा वापर करणे गैर नाही. या किटचा वापर केल्यावर जो काही रिपोर्ट येईल, तो वेबसाइटवर अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच एखाद्याला लक्षणे असतानाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास रुग्णांनी आरटीपीसीआर चाचणी ( RTPCR Test ) करून घ्यावी. जेणे करून त्या रुग्णांवर योग्य उपचार करणे शक्य होत असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे ( Chief Executive Health Officer Mangala Gomar ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

माहिती देतांना महापालिका आरोग्य अधिकारी
  • होम टेस्टिंग किटचा वापर

मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. या लाटेमुळे सर्दी, खोकला, तापाने बहुतेक मुंबईकर हैराण झाले आहेत. सर्दी, खोकला, ताप असताना आरटीपीसीआर चाचणी केल्यास आपण कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असल्याने बहुतेक नागरिक चाचणी करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच आता घरच्या घरी चाचणी करता येईल, अशा होम टेस्टिंग किट उपलब्ध झाल्या आहेत. याचा वापर करून नागरिक घरच्या घरी टेस्ट करून आपल्याला कोरोना झाला की नाही याची चाचणी करत आहेत. मात्र याचा रिपोर्ट वेबसाईटवर अपलोड करत नसल्याचे समोर आले आहे.

  • 'रिपोर्ट वेबसाइटवर अपलोड करा'

याबाबत बोलताना, होम टेस्ट किटचा वापर करणे गैर नाही. ही रॅपिड अँटिजेंन टेस्ट आहे. यामुळे काही मिनिटात आपण पॉझिटीव्ह आहोत का याची माहिती मिळते. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात ही टेस्ट करत आहेत. या टेस्ट नंतर जो काही रिपोर्ट येईल तो संबंधितांनी वेबसाईटवर अपलोड करणे गरजेचे आहे. हा रिपोर्ट अपलोड न केल्याने एखाद्या रुग्णाला लक्षणे असली तरी त्याची माहिती पालिकेला मिळत नाही. यामुळे संबंधित रुग्णावर वेळीच उपचार होऊ शकत नाही. यामुळे जे नागरिक अशा टेस्ट करत असतील त्यांनी आपला रिपोर्ट वेबसाईटवर अपलोड करावा, असे आवाहन डॉ. गोमारे यांनी केले आहे.

  • किटबाबत नियमावली

सेल्फ टेस्ट किटचा वापर करणारे नागरिक आपला रिपोर्ट वेबसाइटवर अपलोड करत नसल्याने त्यामधून किती लोक पॉझिटिव्ह आले याची माहिती मिळत नसल्याने पालिका आयुक्तांनी याबाबत नियमावली काढली आहे. त्यानुसार नागरिकांनी आपल्या टेस्टचा रिपोर्ट वेबसाइटवर अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत ९८ हजार नागरिकांनी आपले रिपोर्ट अपलोड केले असून त्यापैकी ३ हजार नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. किट बनवणाऱ्या कंपन्या, डिस्ट्रिब्युटर आणि केमिस्ट यांनी किट विकत घेणाऱ्या नागरिकांची नोंद करून ती माहिती पालिकेला द्यावी, अशा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

  • 'आरटीपीसीआर चाचणी करा'

सेल्फ टेस्ट किटचा वापर केला तरी जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ते कोरोना पॉझिटिव्ह असतात. त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही. मात्र ज्या रुग्णांना लक्षणे आहेत आणि सेल्फ टेस्ट किटच्या चाचणीत निगेटिव्ह येतील त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल योग्य असल्याने संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्याच्यावर वेळीच उपचार करून इतरांना होणारा प्रसार रोखता येणे शक्य होणार असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले.

हेही वाचा - लसीकरणाची वर्षपूर्ती, ९० टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण - आरोग्य मंत्री राजेश टोपे

Last Updated : Jan 16, 2022, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.