मुंबई - प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने मुंबई- गोरखपूर, पुणे-निजामुद्दीन, मडगाव आणि नागपूर-मडगाव दरम्यान पूजा, उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - टीआरपी घोटाळा : अर्णबच्या याचिकेवर पुढील सुनावणी 5 नोव्हेंबरला
तपशील खालीलप्रमाणे आहेत-
- लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट (२४ फेऱ्या)
गाडी क्रमांक 02165 विशेष द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत दर सोमवार आणि गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 5.23 वाजता सुटेल आणि दरम्यान दुसर्या दिवशी 11.25 वाजता गोरखपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 02166 विशेष द्वि - साप्ताहिक सुपरफास्ट 23 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर पर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार गोरखपूर येथून 3.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 9.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, जांघई, भदोही, वाराणसी, मऊ आणि देवरिया सदर.
संरचनाः 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान आणि 6 द्वितीय आसन श्रेणी.
- पुणे-निजामुद्दीन विशेष एसी सुपरफास्ट साप्ताहिक (12 फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 04418 विशेष एसी सुपरफास्ट साप्ताहिक 20 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत निजामुद्दीन येथून दर मंगळवारी 9.35 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 9.25 वाजता पुण्यात पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 04417 विशेष एसी सुपरफास्ट साप्ताहिक 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत दर गुरुवारी 5.15 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसर्या दिवशी निजामुद्दीनला 05.35 वाजता पोहोचेल.
थांबे : लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा आणि मथुरा.
संरचनाः 6 द्वितीय वातानुकूलित, 10 तृतीय वातानुकूलित.
- नागपूर- मडगाव साप्ताहिक विशेष (6 फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01235 विशेष साप्ताहिक 23 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत नागपूर येथून प्रत्येक शुक्रवारी 4 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी मडगाव येथे 4.40 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01236 विशेष साप्ताहिक मडगाव येथून दर शनिवारी 24 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत दर शनिवारी 7.40 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी 8.30 वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे : वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी
संरचनाः 1द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान आणि 6 द्वितीय आसन श्रेणी.
- पुणे-मडगाव साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01409 विशेष साप्ताहिक 23 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत पुणे येथून दर शुक्रवारी 6.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 8.30 वाजता मडगावला पोहचेल.
ट्रेन क्रमांक 01410 विशेष साप्ताहिक 24 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत मडगाव येथून दर शनिवारी 4 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 5.50 वाजता पुण्याला पोहचेल.
थांबे : लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी
संरचनाः 1 द्वितीय वातानुकूलित, 4तृतीय वातानुकूलित, 11शयनयान, आणि 6 द्वितीय आसन श्रेणी.
विशेष शुल्कावरील 02165, 04417, 01235/01236 आणि 01409/01410 या गाड्यांसाठी बुकिंग 20 ऑक्टोबरपासून पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसिटीसीच्या या वेबसाइटवर उघडले जाईल.
हेही वाचा - ...म्हणून शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!