ETV Bharat / city

कोरोनाशी लढा; 25 हजार पीपीई किटचे उत्पादन करणार मध्य रेल्वे

कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात भारतीय रेल्वे आघाडीवर आहे. भारतीय रेल्वेने 1.5 लाख पीपीई किट तयार करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यापैकी मध्य रेल्वे 25 हजार पीपीई तयार करणार आहे. संपूर्णपणे पीपीई बनवण्यामुळे मोठा फायदा होईल, कारण यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांना संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळेल.

ppe
पीपीई किट
author img

By

Published : Apr 24, 2020, 8:37 PM IST

मुंबई - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत. मध्य रेल्वेने 482 कोचचे आयसोलेशन, अलगीकरण वॉर्ड बनविण्याचे लक्ष्य पूर्ण केले. त्यानंतर आता मध्य रेल्वे कर्मचारी, डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्यासाठी 25 हजार पीपीई किटचे उत्पादन करणार आहे.

भारतीय रेल्वेने 1.5 लाख पीपीई किट तयार करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यापैकी मध्य रेल्वे 25 हजार पीपीई तयार करणार आहे. हे पीपीई कव्हरऑल डीआरडीओद्वारे मंजूर केलेल्या मानक आणि तपशीलानुसार उत्तर रेल्वेने सादर केलेल्या नमुन्यांप्रमाणे असेल. कच्चा माल शासकीय मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून घेतला जाईल. प्रत्येक बनवलेल्या कवरऑलसाठी रेल्वेला जीएसटीसह 422 रुपये खर्च येईल, तर बाजारात हेच 808.50 रुपयात उपलब्ध आहे. मध्य रेल्वेला स्वत: संपूर्णपणे पीपीई बनवण्यामुळे मोठा फायदा होईल, कारण यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांना संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळेल. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात भारतीय रेल्वे आघाडीवर आहे. भारतीय रेल्वेने अलीकडेच आपल्या रेल्वे डब्यांना (कोचेसना) व्हेंटिलेटरसह जीवनदायीनी असलेल्या कोविड-रेडी आयसोलेशन, क्वारंटाईन वॉर्डमध्ये रुपांतरित करून रेल्वे प्रशासनाची तत्परता दाखवून दिली आहे. ही वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे मध्य रेल्वेच्या परळ आणि माटुंगा कार्यशाळेत शिवण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.