ETV Bharat / city

Central Railway Traffic Disrupted : रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - कसाराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील उंबरमाळी कसारा दरम्यान रुळाला तडा गेल्याने ( Cracks in Railway Tracks ) कसाराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत ( Central Railway Traffic Disrupted ) झाली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने खर्डी स्थानक प्रबंधकाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल
लोकल
author img

By

Published : Apr 3, 2022, 12:24 PM IST

Updated : Apr 3, 2022, 1:50 PM IST

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील उंबरमाळी कसारा दरम्यान रुळाला तडा गेल्याने ( Cracks in Railway Tracks ) कसाराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत ( Central Railway Traffic Disrupted ) झाली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने खर्डी स्थानक प्रबंधकाकडून सांगण्यात आले आहे.

तब्बल एक तास लोकल वाहतूक विस्कळीत - मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. 3 मार्च) सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर उंबरमाळी ते कसारा स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली आहे. यामुळे कसाराकडे जाणारी लोकल वाहतूक तब्बल 1 तासासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, या घटनेची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाला मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिक पथक घटनास्थळी दाखल होऊन हा बिघाड एका तासात दुरुस्त करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजता लोकल वाहतूक पूर्ववत झाली आहे.

प्रवाशांना ताटकळत बसावे लागले - आज मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे ते कल्याण दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यातच रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक याचे पूर्णतः तीन तेरा वाजले आहे. सुटीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबई बाहेर फिरायला जातात. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले आहे. या घटनेमुळे कसारा दिशेने जाणाऱ्या गाड्या काही काळ उशिराने धावत आहेत. याचा परिणाम मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.

हेही वाचा - Summons to Praveen Darekar : मुंबई बँक फसवणूक प्रकरणी दरेकरांना चौकशीचे समन्स

Last Updated : Apr 3, 2022, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.