मुंबई - हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद ( Harbour Line Ac Train Shift To Main Line ) मिळत आहे. त्यामुळे शनिवारपासून ( 14 मे ) एसी लोकल बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेतला ( Central Railway Shift 16 Ac Train Services ) आहे. याशिवाय मध्य रेल्वेचा मुख्य मार्गावर १२ एसी लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता हार्बर मार्गावर एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना मोठा फटका बसला ( Mumbai Ac Local Train ) आहे.
रेल्वेचा निर्णयामुळे हार्बरवासियांना फटका - एसी लोकलचे भाडे कपातीनंतर मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मात्र, हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. मध्य रेल्वेला हार्बर मार्गावर एसी लोकल चालवणे जड जात होते. त्यामुळे मध्य रेल्वेने आता शनिवारपासून हार्बर मार्गावरील १६ एसी लोकल फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ एसी लोकल फेऱ्यांचा जागी सामान्य लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, टिटवाळा आणि अंबरनाथ या स्थानकांचा दरम्यान शनिवारपासून १२ एसी लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकल फेऱ्यांची संख्या ४४ वरून ५६ पर्यंत जाणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे मुख्य मार्गावरील एसी लोकलचा प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर हार्बर मार्गांवरील एसी लोकलचा प्रवाशांना मोठा झटका बसला आहे.
अशा असणार लोकल फेऱ्या - आता रविवार वगळता दररोज मध्य रेल्वे मार्गावरील मुख्य मार्गवर ८९४, हार्बर मार्गावर ६१४ ट्रान्स हार्बर २६२ आणि चौथा कॉरिडॉर मार्ग म्हणजे बेलापूर /नेरूळ- खारकोपर मार्गावर ४० अशा एकूण १ हजार ८१० लोकल फेऱ्या दररोज धावतील. ज्यामध्ये १ हजार ७५४ सामान्य लोकल तर ५६ एसी लोकल फेऱ्यांचा समावेश असणार आहे. तर रविवारी व नामनिर्देशित सुटीच्या दिवशी मध्य रेल्वेचा मुख्य मार्गावर वातानुकूलित सेवांची एकूण संख्या १४ असणार आहे, तर एकूण संख्या ६७३ पासून ६८७ पर्यंत वाढवण्यात येईल.
नव्या १२ एसी लोकलचे वेळापत्रक -
- सीएसएमटी येथून सकाळी ६.३० वाजता टिटवाळा करीता लोकल.
- सीएसएमटी येथून सकाळी १०.२२ वाजता डोंबिवली करीता लोकल.
- सीएसएमटी येथून दुपारी १.१५, सायंकाळी ५.०० वाजता आणि दादर येथून रात्री ७.३९ अंबरनाथ करीता लोकल.
- सीएसएमटी येथून रात्री १०.२० वाजता ठाणे करीता लोकल.
- ठाणे येथून सकाळी ५.२४ वाजता सीएसएमटी करीता लोकल.
- टिटवाळा येथून सकाळी ८.३३ वाजता सीएसएमटी करीता लोकल.
- डोंबिवली येथून सकाळी ११.४८ वाजता सीएसएमटी करीता लोकल.
- अंबरनाथ येथून दुपारी ३.१२ व रात्री ८.५० वाजता सीएसएमटी करीता लोकल.
- अंबरनाथ येथून सायंकाळी ६.३० वाजता दादर करीता लोकल.
रविवारी/सुट्टीच्या १४ एसी लोकलचे वेळापत्रक -
- कुर्ला येथून पहाटे ४.४६ व रात्री ९.५६ वाजता छत्रपती सीएसएमटी करीता धीमी लोकल.
- कल्याण येथून सायंकाळी ७.५६ वाजता सीएसएमटी करीता धीमी लोकल.
- डोंबिवली येथून सायंकाळी ४.५५ वाजता सीएसएमटी करीता धीमी लोकल.
- सीएसएमटी येथून दुपारी ३.२४ वाजता डोंबिवली करीता धीमी लोकल.
- कल्याण येथून सकाळी ११.२२ वाजता दादर करीता जलद लोकल.
- कल्याण येथून सकाळी ६.३२ व सकाळी ८.५४ वाजता सीएसएमटी करीता जलद लोकल.
- बदलापूर येथून दुपारी १.४८ वाजता सीएसएमटी करीता जलद लोकल.
- सीएसएमटी येथून सकाळी ५.२०, सकाळी ७.४३, सकाळी १०.०४ आणि सायंकाळी ६.३६ वाजता कल्याण करीता जलद लोकल.
- दादर येथून दुपारी १२.३० वाजता बदलापूर करीता जलद लोकल.
परतावा -
हार्बर मार्गावरील वातानुकूलित सेवांच्या सीझन (मासिक/त्रैमासिक) तिकीट धारक प्रवासी उपनगरी स्थानकांवर यूटीएस आरक्षण काऊंटरमधून शिल्लक दिवसाचे वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी भाडे फरकाचा परतावा प्राप्त करू शकतात. ते सामान्य सेवांतील प्रथम श्रेणीतून प्रवास करू शकतात.
हेही वाचा - Railway Ministry Advises Wear Mask : प्रवाशांनो लक्ष द्या; रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक