ETV Bharat / city

Summer Special Train : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पाच विशेष गाड्या

author img

By

Published : Mar 20, 2022, 7:02 PM IST

यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर गावी जाणाऱ्यांची ( Summer Special Train ) संख्या वाढणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून पाच उन्हाळी विशेष गाड्यांच्या 96 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली ( Central Railway Announced 96 Summer Special Train ) आहे.

Special Train
Special Train

मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेकांनी उन्हाळ्यात घरीच सुटी साजरी केली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने यंदा उन्हाळ्याची सुट्टी आणि लग्न सराईच्या निमित्ताने बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे-जयपूर/करमळी, मुंबई-शालीमार आणि नागपूर-मडगाव दरम्यान पाच उन्हाळी विशेषच्या ( Summer Special Train ) 96 फेऱ्या चालविण्याची घोषणा केली ( Central Railway Announced 96 Summer Special Train ) आहे.

मुंबई ते शालीमार 20 फेऱ्या

मुंबई ते शालीमार पूर्णत: आरक्षित वातानुकूलित अतिजलद विशेषच्या 20 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01019 विशेष एलटीटी येथून 12 एप्रिल ते 14 जूनपर्यंत दर मंगळवारी रात्री 8.15 वाजता सुटेल आणि शालीमार येथे तिसर्‍या दिवशी पहाटे 5.15 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01020 विशेष शालिमार येथून 14 एप्रिल ते 16 जूनपर्यंत दर गुरुवारी सायंकाळी 5.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11.45 वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटा नगर, खड़गपूर, संत्रागाछी या स्थानकावर थांबा दिला जाईल.

पनवेल ते करमळी दरम्यान 18 विशेष फेऱ्या

पनवेल ते करमळी दरम्यान 18 विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01405 विशेष पनवेल येथून 9 एप्रिल ते 4 जूनपर्यंत दर शनिवारी रात्री 11 वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01406 विशेष गाडी 9 एप्रिल ते 4 जूनपर्यंत दर शनिवारी सकाळी 9.20 वाजता करमळी येथून सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री 8 वाजता पोहोचेल. या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि या स्थानकावर थांबा दिला जाईल.

पुणे ते करमळी दरम्यान 18 विशेष फेऱ्या

पुणे ते करमळी दरम्यान 18 विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहे. ज्यामध्ये गाडी क्रमांक 01403 विशेष गाडी 8 एप्रिल ते 3 जूनपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून सायंकाळी 5.30 वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01404 विशेष गाडी 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर रविवारी करमळी येथून सकाळी 9.20 वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री 11.35 वाजता पोहोचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि येथे थांबे देण्यात येणार आहेत.

पुणे ते जयपूर एसी सुपरफास्ट विशेष 20 फेऱ्या

पुणे ते जयपूर दरम्यान आरक्षित वातानुकूलित सुपरफास्ट स्पेशलच्या 20 फेऱ्या चालविण्यात येणार आहे. ज्यामध्ये गाडी क्रमांक 01401 विशेष गाडी 12 एप्रिल ते 14 जूनपर्यंत दर मंगळवारी पुणे येथून रात्री 12.30 वाजता सुटेल आणि जयपूरला त्याच दिवशी रात्री 11.10 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01402 विशेष गाडी जयपूर येथून 13 एप्रिल ते 15 जूनपर्यंत दर बुधवारी रात्री 12.35 वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री 8 वाजता पोहोचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौड़गड, भिलवाडा, बिजयनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगड, फुलेरा येथे थांबा देण्यात येणार आहे.

नागपूर ते मडगाव दरम्यान विशेष 20 फेऱ्या

गाडी क्रमांक 01201 विशेष गाडी 9 एप्रिल ते 11 जूनपर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01202 विशेष गाडी 10 एप्रिल ते 12 जूनपर्यंत पर्यंत दर रविवारी रात्री 8.15 वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8.10 वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि येथे थांबा देण्यात येणार आहे.

आरक्षण सुरु

या विशेष गाड्यांचे 01403/01404, 01405/01406, 01201/01202 आणि अतिजलद वातानुकूलित विशेष क्र. 01401 आणि 01019 चे बुकिंग विशेष शुल्कासह 19 मार्चपासून सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

हेही वाचा - Goa CM Oath Ceremony : 'शपथविधी सोहळ्याबाबत उद्या निर्णय घेऊ'; काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.