ETV Bharat / city

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ आढळली बेवारस कार, जिलेटीनच्या कांड्या सापडल्या

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना याआधीदेखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आज त्यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या संशयित कारमुळे पोलिसांनी आणखी कडक बंदोबस्त ठेवला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच मुंबई पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला मार्गदर्शन केले.

car
बेवारस गाडी
author img

By

Published : Feb 25, 2021, 7:44 PM IST

Updated : Feb 25, 2021, 10:36 PM IST

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वांत श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर आज (गुरुवार) सायंकाळी काळ्या रंगाची बेवारस कार आढळून आली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) या कारची सखोल तपासणी केली. यात जिलेटीनच्या 20 कांड्या आढळून आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या गाडीबाबतची सर्व माहिती तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. रात्री 1 वाजताच्या सुमारास ही कार येथे पार्क करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून समोर आले आहे. तसेच त्यानंतर या कारमधील काही लोक दुसऱ्या एका कारमध्ये बसून या परिसरातून बाहेर गेल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील सर्व माहितीची तपासणी करण्यात येत आहे. एटीएस पथकाकडून घटनास्थळाची पाहणी कऱण्यात आली आहे.

प्रतिनिधी विशाल सवणे यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - विशेष: भंडारा जिल्ह्यात पैश्यांसाठी, खाण्यासाठी आणि अंधश्रद्धेपोटी वन्य प्राण्यांची शिकार

पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईतील पेडर रोड परिसरातील मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ एक बेवारस गाडी आढळून आल्यामुळे आज मोठी खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून या गाडीची तपासणी करण्यात आली. यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्याचे समोर आले आहे. या कारच्या क्रमांकावरुन त्याच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे. त्यानंतर या प्रकरणी आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सखोल तयार सुरु केला असून लवकरच काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फूटेज

अंबानींच्या घराजवळची सुरक्षा वाढवली -

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना याआधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र, आज त्यांच्या बंगल्याबाहेर वाढलेल्या संशयित कारमुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सुरुवातील ही पोलिसांची मॉकड्रिल असल्याची अफवा पसरली होती. मात्र, प्रत्यक्षात हा घातपाताचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे सर्व यंत्रणांना, तसेच पोलिसांना सर्व खबरदारी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरून प्रतिनिधी विशाल सावणे यांनी घेतलेला आढावा

जिलेटीनचा तपास क्राईम ब्रँच करणार - अनिल देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुख

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या 20 कांड्या सापडल्या आहेत. यासंदर्भात अधिकृत दुजोरा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. या गाडीचा मालक व जिलेटीन कांड्या कशा प्रकारे मुंबईत आल्या, याचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मुकेश अंबानी यांची संपत्ती

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस गाडी आढळली

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे सलग १३ व्या वर्षी फोर्ब्सच्या सर्वात १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या क्रमांवर आहेत. अंबानी यांच्या संपत्तीत ३७.३ अब्ज डॉलरची वाढ होऊन एकूण ८८.७ अब्ज संपत्ती झाली आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत ७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे.

अंबानी यांना झेड सुरक्षा

मुकेश अंबानींच्या घराजवळची परिस्थिती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना ‘सीआरपीएफ’ची ‘झेड’ सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच खासगी सुरक्षा रक्षकदेखील कायम त्यांच्याशेजारी तैनात असतात. त्यांच्या बंगल्याशेजारी हाय सेक्युरिटी झोन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात स्फोटके कसे काय आढळून आले हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

इस्रायली दुतावासाबाहेर स्फोट

काही दिवसांपूर्वी मध्य दिल्लीच्या इस्रायली दुतावासाजवळ मध्यम स्वरुपाचा आयईडी स्फोट झाला होता. त्याला एक महिनाही होत नाही तोच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील बंगल्याजवळ बेवारस कार आढळून आली आहे. विशेष म्हणजे या कारमध्ये जिलेटीनच्या २० कांड्या सापडल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंगले असलेल्या विजय चौकापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर इस्रायली दुतावास आहे. त्यामुळे येथे प्रचंड पोलिस बंदोबस्त असतो. असे असतानाही आयईडीचा मध्यम स्वरुपाचा स्फोट कसा झाला, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणेला पडला होता.

Last Updated : Feb 25, 2021, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.