नवी दिल्ली - सुल्ली डिल आणि बुल्ली बाई अॅप ( Bully Bai app case ) प्रकरणातील आरोपींना सोमवारी दिल्लीतील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयातून जामीन मिळाला. ओंकारेश्वर ठाकूर ( Sessions court bail Bully Bai accused ) आणि नीरज बिश्नोई ( Niraj Bishnoi bail Bully Bai case ) यांच्याविरुद्ध सायबर सेलने आरोपपत्र दाखल केले आहे. केवळ एफएसएलचा अहवाल येणे बाकी आहे, ज्याच्याशी ते छेडछाड करू शकत नाही. त्यामुळे, न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने सुल्ली डील प्रकरणी ओंकारेश्वर ठाकूरला अटक केली होती. तेच बुल्ली बाई अॅप प्रकरणात निरज बिश्नोईला अटक करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात काही दिवसांपूर्वी सायबर सेलने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर आरोपीच्या वकिलाच्या वतीने सीएमएमच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
यामध्ये आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात, पूरक आरोपपत्र दाखल करायचे आहे, ज्यातून एफएसएलचा अहवाल येईल. यामध्ये आरोपी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू शकत नाही. त्यामुळे, त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
सुनावणीदरम्यान वकिलाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला. न्यायालयाने मानवतावादी पैलू लक्षात घेऊन त्यांचा जामीन मंजूर केला आहे. दोन्ही आरोपींचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यामुळे, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांना तुरुंगात ठेवण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
जामीन देण्यासोबतच न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. आरोपी कोणत्याही साक्षीदाराला धमकावणार नाही आणि पुराव्याशी छेडछाड करणार नाही. कोणत्याही पीडितशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार नाही. तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे लागेल आणि आणि लोकेशन त्याला सांगावे लागेल. देशाबाहेर जाणार नाही आणि प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहावे लागेल. जामिनावर तुरुंगाबाहेर असताना पुन्हा असे गुन्हे करणार नाही, अशा या अटी आहेत.