मुंबई - बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली Building Collapsed In Borivali 2022 कोसळली आहे. आज दुपारी बोरिवली पश्चिम साईबाबा नगरला लागून असलेली गीतांजली बिल्डिंग नावाची 4 मजली इमारत अचानक Gitanjali building collapsed in Borivali कोसळली. इमारत 35 वर्षे जुनी असल्याने जीर्ण झाली होती. त्यामुळे इमारत आगोदरच रिकामी करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, 3 पाण्याचे टँकर, 8 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
28 जून 2022 ला कुर्ल्यात कोसळली होती इमारत कुर्ला पूर्व, शिवसृष्टी रोडवरील नाईक नगर सोसायटीमधील एका इमारतीचा काही भाग मध्यरात्री कोसळला The building of Naik Nagar Society collapsed . एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ३२ जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ऑडिटरची चौकशी करून करावी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.
हेही वाचा - Dahi Handi 2022 गोविंदा आला रे, महाराष्ट्रात दहीहंडीचा जाणून घ्या इतिहास