ETV Bharat / city

सणासुदीच्या काळात बिल्डरांकडून भरघोस सवलती; विक्री वाढण्याची आशा - घर खरेदी योजना न्यूज

गेल्या काही वर्षात घरखरेदीसाठी कुठलाही शुभ मुहूर्त पाहणे कमी झाले आहे. पण तरीही शुभ मुहूर्तावरच घरासारखी खरेदी करण्याची मानसिकता मोठ्या संख्येने कायम आहे. त्यातही वर्षातील साडेतीन मुहूर्त घर खरेदीसाठी महत्त्वाचे मानले जाते.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Oct 22, 2020, 12:15 PM IST

Updated : Oct 22, 2020, 2:47 PM IST

मुंबई - प्रत्येकजण स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहतो. आयुष्यातील सर्वात मोठे असलेले घराचे स्वप्न एखाद्या शुभ मुहूर्तावर साकारावे, ही भारतीय मानसिकता आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीत घरांची नेहमी मोठ्या प्रमाणात खरेदी होते. ही मानसिकता लक्षात घेऊन अनेक बिल्डरांनी खरेदीसाठी सवलती जाहीर केल्या आहेत.

दरवर्षी दसरा-दिवाळीच्या काळात मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी बिल्डरांकडून सवलती जाहीर केल्या जातात. पण, यंदा कोरोनाच्या काळात मालमत्ता बाजारपेठ मंदीच्या खाईत ढकलली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे बाजारात वातावरण असेल का प्रश्न होता. पण प्रत्यक्षात मात्र यंदाही दसरा-दिवाळीत मालमत्ता बाजारपेठेत उत्साह निर्माण झाला आहे. या सणासुदीच्या काळात विक्री वाढेल, या आशेतून अनेक बिल्डरांनी सवलती जाहीर केल्या आहेत.

सणासुदीच्या काळात बिल्डरांकडून भरघोस सवलती

गेल्या काही वर्षात घरखरेदीसाठी कुठलाही शुभ मुहूर्त पाहणे कमी झाले आहे. पण तरीही शुभ मुहूर्तावरच घरासारखी खरेदी करण्याची मानसिकता मोठ्या संख्येने कायम आहे. त्यातही वर्षातील साडेतीन मुहूर्त घर खरेदीसाठी महत्त्वाचे मानले जाते. यात गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा आणि अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्त आहेत. यंदा मालमत्ता बाजारपेठेत सणासुदीला काय चित्र असेल, असा प्रश्न होता. मार्चपासून या क्षेत्रात मंदी आहे. पण बिल्डरांनी मंदीतच संधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच यंदाही मुंबई-एमएमआरमधील बिल्डरांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती देऊ केल्या आहेत. यात अगदी छोट्या बिल्डरांपासून बड्या बिल्डरांचा समावेश आहे.

अशा आहेत गृहखरेदीत सवलती-

बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या नरेडेको (नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल) संघटनेतील सर्वच सदस्य बिल्डरांनी आपल्या प्रकल्पात 'शून्य मुद्रांक शूल्क' लागू केले आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क 2 टक्के केले आहे. 31 डिसेंबरपर्यंत 2 टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत 3 टक्के मुद्रांक शुल्क लागू असणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा आणखी फायदा ग्राहकांना मिळवून देण्यासाठी नरेडकोतील बिल्डरांच्या प्रकल्पात घरखरेदी करणाऱ्यांचे मुद्रांक शुल्क बिल्डर भरणार असल्याची माहिती नरेडकोचे अध्यक्ष (महाराष्ट्र) अशोक मोहनानी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. कोरोना-लॉकडाऊनच्या काळात मालमत्ता बाजारपेठेत मंदीचे वातावरण असताना या क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क कमी करत ग्राहकांना दिलासा दिला. तर नरेडकोने त्यापुढे जात 2 टक्के मुद्रांक शुल्काचा भार आम्ही उचलू असे जाहीर करत ग्राहकांना आणखी दिलासा दिला. ही योजना 31 डिसेंबर लागू असणार आहे. नवरात्र-दसरा-दिवाळीत याचा मोठा फायदा ग्राहकांना होईल असेही मोहनानी यांनी स्पष्ट केले. दरवर्षी दसरा-दिवाळीत घरखरेदी-विक्री वाढते. तेव्हा यंदा कोरोनाच्या काळात ही मालमत्ता बाजारपेठेत तेजी येईल, अशी अपेक्षा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एकूण रकमेच्या केवळ 10 टक्के रक्कम भरून गृहप्रवेश शक्य-
नवरात्र-दसरा-दिवाळीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या संख्येने बिल्डरांनी सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये शून्य मुद्रांक शुल्क, जीएसटी, समान मासिक हप्त्यात (ईएमआय)सवलत, एक वर्षाचे देखरेख शुल्क (मेंटनस चार्ज) माफ, वरच्या मजल्यासाठीच्या दरात सवलत, आकर्षक भेटवस्तू अशा सवलतींचा समावेश आहे. मुंबईतील वाधवा समुहानेही ग्राहकांना अनेक सवलती देऊ केल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे मालमत्ता बाजारपेठेत यंदाही विक्रीला तेजी येईल, अशी आशा वाधवा समुहाने व्यक्त केली आहे. वाधवा ग्रुपने दादरपासून मुलुंडपर्यंतच्या विविध प्रकल्पात सवलती दिल्या आहेत. 'हाय राईज पे वाईज' सवलतद्वारे या समुहाने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जितक्या उंचावर अर्थात जितक्या वरच्या मजल्यावर घर जाते तितकी घराची किंमत वाढते. अशावेळी वाधवा समूहाने वरच्या मजल्यावर घरांच्या किमतीत कपात केली आहे. तर काही प्रकल्पात 'रेडी टू मूव्ह' म्हणत फक्त 10 टक्के रक्कम भरा आणि दसरा-दिवाळीला नव्या घरात प्रवेश करा अशी सवलत दिली आहे. या सवलतीनुसार ग्राहकाने घराच्या एकूण रकमेच्या केवळ 10 टक्के रक्कम भरायची आहे. त्यानंतर एक वर्षांनंतर उर्वरीत रक्कम भरायची अशी ही सवलत असल्याची माहिती भास्कर जैन, प्रमुख, सेल्स, मार्केटिंग आणि सीआरएम, वाधवा समूह यांनी दिली आहे.

एकीकडे बिल्डर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती देत असताना बॅंकाही मागे नाहीत. काही बँकांनी गृहकर्ज सवलती जाहीर केल्या आहेत. तर देशातील आघाडीच्या अशा एसबीआय बॅंकेने सणासुदीला गृहकर्ज व्याजदरात 0.25 टक्के कपात केली आहे. सर्व नवीन गृहकर्ज धारकांसाठी ही सवलत लागू करत बँकेने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या पाव टक्के कपातीमुळे ग्राहकांचा ईएमआयचा भार नक्कीच काहीसा हलका होणार आहे. एकूणच कोरोनाच्या काळातही मालमत्ता बाजारपेठेत उत्साह असून यंदाही विक्री वाढेल, अशी आशा या क्षेत्राला आहे. घर खरेदीमधील सवलती आणि बँकांनी कर्जात केलेली कपात अशा स्थितीत मालमत्ता क्षेत्राला चालना मिळेल, अशी बिल्डरांना अपेक्षा आहे.

Last Updated : Oct 22, 2020, 2:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.