मुंबई - रशिया युक्रेन युद्धात उद्या काय होईल ते कोणीही सांगू शकत नाही. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले ( Indian students stuck in ukraine ) हजारो तरुण अडकले आहेत. त्यातच रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा ( indian student death in ukraine ) मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.
युद्धभूमीवर मुंबईतील 6 विद्यार्थी अडकले ( 6 mumbai students stuck in ukraine ) आहेत. यापैकीच गोरेगावची 'केरनाप कृपाकरन' ही मुलगी युक्रेनमध्ये अडकली आहे. रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तो विद्यार्थी केरनाप यांच्याच महाविद्यालयात शिकणारा होता. त्यामुळे सध्या तिथील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भारत सरकारचे सहकार्य किती ?
या संदर्भात बोलताना केरनाप यांचे भाऊ जॉन्सन सांगतात की, "भारतीय दूतावासाकडून मदत मिळतेय पण फार कमी प्रमाणात आहे. कारण तिथे फक्त माझी बहिण नाही, तर हजारो विद्यार्थी आहेत. सरकार फक्त सुरक्षित क्षेत्रात विमान पाठवित आहे. फक्त, इतर विद्यार्थ्यांचे काय ? सरकारने त्यांनासुद्धा मदत केली पाहिजे."
हेही वाचा-Four People Died in Pune : पुण्यात सेप्टिक टँक साफ करताना चौघांचा गुदमरून मृत्यू
बहिण सध्या सुरक्षित
जॉन्सन सांगतात की, "माझी बहिण अगदी मंगळवारपर्यंत रेड अलर्ट भागात होती. मात्र, रात्री माझी बहिण आणि आणखी सात आठ जण हिंमत करून तिथून बाहेर पडले. त्यामुळे सध्या ती सेफझोनमध्ये आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे. त्यांनी धोक्याच्या विभागातून तेथील मुलांचीदेखील लवकरात लवकर सुटका करावी."
भारतात परीक्षाही द्यावीच लागते
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विधानावर बोलताना जॉन्सन म्हणाले की, "मंत्री म्हणत आहेत, तसे काही नाही. कारण, काही मुल पुन्हा परीक्षा देतात व पास होतात. आपल्याकडे वैद्यकीय शिक्षणासाठी तेवढ्या जागाच नाहीत. त्यामुळे विदेशातील शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा लागतो. तिकडून शिकून आले की तुम्ही आपली प्रॅक्टिस सुरू करू शकत नाही. भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी तुम्हाला इंडियन मेडिकल असोसिएशनची परीक्षा द्यावीच लागते. ती पास झालात तरच तुम्हाला येथे प्रॅक्टिस सुरू करता येते."