मुंबई - मालाडच्या मालवणी भागामध्ये तीन मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली 2-3 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन विभागाने दिली आहे.
Breaking News: 'सीरम'चे एमडी सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार - महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
21:06 January 25
मुंबईमध्ये तीन मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची भीती
20:16 January 25
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचित वाढ, दिवसभरात 33 हजार रुग्ण; 86 जणांचा मृत्यू
मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या घटत असताना आज किंचितशी वाढ झाली आहे. सोमवारी 28 हजार रुग्ण सापडले होते, आज दिवसभरात 30 हजार 914 रुग्ण आढळून आले असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्ण तीन लाख असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. ओमायक्रोनचे आज 13 रुग्ण सापडले असून सर्व पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
20:13 January 25
'सीरम'चे एमडी सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार
-
Microsoft CEO Satya Nadella, Alphabet CEO Sundar Pichai, SII MD Cyrus Poonawalla to be conferred with Padma Bhushan
— ANI (@ANI) January 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Olympians Neeraj Chopra, Pramod Bhagat & Vandana Kataria, and singer Sonu Nigam to be awarded Padma Shri pic.twitter.com/J5K9aX9Qxz
">Microsoft CEO Satya Nadella, Alphabet CEO Sundar Pichai, SII MD Cyrus Poonawalla to be conferred with Padma Bhushan
— ANI (@ANI) January 25, 2022
Olympians Neeraj Chopra, Pramod Bhagat & Vandana Kataria, and singer Sonu Nigam to be awarded Padma Shri pic.twitter.com/J5K9aX9QxzMicrosoft CEO Satya Nadella, Alphabet CEO Sundar Pichai, SII MD Cyrus Poonawalla to be conferred with Padma Bhushan

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, एसआयआयचे एमडी सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ऑलिंपियन नीरज चोप्रा, प्रमोद भगत आणि वंदना कटारिया आणि गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार
20:06 January 25
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील ऐतिहासिक स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई
-
Maharashtra: Mumbai's Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, BMC Headquarters and Mantralaya illuminated on the eve of #RepublicDay pic.twitter.com/aN6RyXoL6C

">Maharashtra: Mumbai's Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, BMC Headquarters and Mantralaya illuminated on the eve of #RepublicDay pic.twitter.com/aN6RyXoL6C
— ANI (@ANI) January 25, 2022Maharashtra: Mumbai's Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, BMC Headquarters and Mantralaya illuminated on the eve of #RepublicDay pic.twitter.com/aN6RyXoL6C
— ANI (@ANI) January 25, 2022
मुंबई : #RepublicDay च्या पूर्वसंध्येला मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, BMC मुख्यालय आणि मंत्रालय उजळून निघाले
19:50 January 25
जखमी वाघाने वाहन चालकांवर केला हल्ला, वनविभागाच्या पथकाने बेशुद्ध करून केलं रेस्क्यू
नागपूर - अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या टी-1 नामक वाघाने महामार्गाच्या कडेला लघु शंकेसाठी थांबलेल्या नवरा बायकोवर हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने वाघाच्या हल्ल्यात ते दोघेही थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील रहिवासी आहेत.घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या बचाव पथकाने जखमी वाघाचा शोध घेतला, त्यानंतर टी-1 वाघाला बेशुद्ध करून सुखरूप रेस्क्यू केले आहे.
19:11 January 25
Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी १८०० च्या वर रुग्णसंख्या, १८१५ नव्या रुग्णांची नोंद, १० जणांचा मृत्यू
मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. शनिवारी ३५६८ रुग्णांची तर काल रविवारी २५५० रुग्णांची नोंद झाली. काल सोमवारी त्यात आणखी घट होऊन १८५७ रुग्णांची नोंद झाली. आज मंगळवारी पुन्हा १८१५ रुग्णांची तर १० मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या २२ हजार १८५ सक्रिय रुग्ण आहेत.
18:59 January 25
नवी मुंबईत महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल
नवी मुंबई - नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सीबीडी परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रविण बाबुलाल निकुंभ असे या पोलीसाचे नाव असून सीबीडी पोलिसांनी या पोलिसाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
17:25 January 25
लता दीदींच्या प्रकृतीत किरकोळ सुधारणा - डॉ. प्रतित समदानी
-
There is a marginal improvement in Lata Didi’s health and she continues to be in the ICU: Dr Pratit Samdani, who's treating her at Mumbai's Breach Candy Hospital pic.twitter.com/CRPB9D2r2f

">There is a marginal improvement in Lata Didi’s health and she continues to be in the ICU: Dr Pratit Samdani, who's treating her at Mumbai's Breach Candy Hospital pic.twitter.com/CRPB9D2r2f
— ANI (@ANI) January 25, 2022There is a marginal improvement in Lata Didi’s health and she continues to be in the ICU: Dr Pratit Samdani, who's treating her at Mumbai's Breach Candy Hospital pic.twitter.com/CRPB9D2r2f
— ANI (@ANI) January 25, 2022
मुंबई - लता दीदींच्या प्रकृतीत किरकोळ सुधारणा झाली आहे. त्यांच्यावर अजूनही ICU मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. प्रतित समदानी यांनी दिली.
17:22 January 25
मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी सज्ज - आशिष शेलार
मुंबई महापालिकेची निवडणूक केव्हाही झाली, तरी सत्ताधारी शिवसेनेला खाली खेचण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठीच आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडल्याची माहीती भाजपा नेते अॅड आशिष शेलार यांनी दिली.
16:38 January 25
'देशद्रोही नवाब मलिक वापस जा, वापस जा' म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याना परभणीत अटक
परभणी - अल्पसंख्यांक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून, ते देशद्रोही आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते झेंडावंदन करू नये, या मागणीसाठी परभणीत भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याने काही काळ परभणीत तणाव निर्माण झाला होता.
16:06 January 25
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाचा दिलासा, अश्लीलतेच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
मुंबई - हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याने 2007 मध्ये राजस्थानमधील एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे सार्वजनिकपणे चुंबन घेतले होते. त्यानंतर तिच्याविरुद्ध अश्लीलताचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातून मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्त केले.
15:34 January 25
संजय पांडेंना महासंचालक पदावर राहण्याचा अधिकार काय? - उच्च न्यायालय
मुंबई - संजय पांडेंना महासंचालक पदावर राहण्याचा अधिकार काय?, पात्रतेत बसत नसताना तुम्हाला या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा मुंबई उच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केला. ॲड. दत्ता मानेंची संजय पांडे यांना मुदतवाढ देण्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेत UPSC ची शिफारस नसतानाही पांडे यांना DGP पदावर बसवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
15:03 January 25
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आखाड्यात
मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणत आरोपी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या आखाड्यात सशर्त जामिनावर सुटका करण्यात आलेल्या आरोपीं क्र 04 मेजर रमेश शिवजी उपाध्याय हे जनता दल (युनायटेड) पक्षाच्या वतीने बलिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
14:53 January 25
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आनंदराव अडसुळाच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी तांत्रिक कारणामुळे तहकूब, 1 फेब्रुवारीला पुढील सुनावणी
मुंबई-सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका केली होती. त्याच्यावर आज मंगळवार (दि.25) रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे आज सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आजही आनंदराव अडसूळ यांना कुठलाही दिलासा मिळाला नसून पुढील सुनावणी 01 फेब्रुवारीला होणार आहे. सक्तवसुली संचालनाल ED ने आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
13:39 January 25
Breaking News: नागपूर पोलिसांनी लावला चड्डी बनियन गँगवर मोक्का
नागपूर - शहरासह परिसरातील नागरिकांना लुटणाऱ्या चड्डी बनियन गँगवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीच्या म्होरक्यासह 9 कुख्यात दरोडेखोरांवर पोलिसांनी ही कारवाई केली.
13:29 January 25
Breaking News: सरसंघचालकांनी नाकारली होती सुभाषचंद्र बोस यांना भेट; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा दावा
यवतमाळ - नाशिक येथे सरसंघचालक हेडगेवार हे मुक्कामी होते. सुभाष चंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला त्यांच्याकडे पाठवले. मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने भेट नाकारली, असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वणी येथील कार्यक्रमात बोलताना दिला. त्यांच्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, की यांनीच जाती जातीत भांडण तंटे उभे केले. आता तेच गुलाम लोक आज शिकवायला निघाले, या बद्दल चिंता व्यक्त केली. सरसंघचालक हेडगेवार यांनी 1930 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
13:22 January 25
Breaking News: सर्वोच्च न्यायालयात मुकुल रोहतगी मांडणार आमदार नितेश राणेंची बाजू
मुंबई - नितेश राणे यांनी संतोष परब हल्ला प्रकरणात जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जावर 27 जानेवारीला सुनावणी पार पडणार आहे. आमदार नितेश राणे यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
13:17 January 25
Breaking News: सांगलीत पुन्हा एकदा गव्याचा थरार. . . नागरिकांमध्ये दहशत
सांगली - शहराजवळ पुन्हा एकदा गव्या रेड्याचा थरार पाहायला मिळत आहे. शहरानजीकच्या बामणी या ठिकाणी गवा रेडा घुसला आहे. त्यामुळे एकच धावपळ उडाली असून वनविभागाकडून गव्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या अधिवासात पाठवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र शहराजवळ पुन्हा गव्याच्या वावरामुळे सांगलीकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
12:23 January 25
Breaking News: संजय राऊत यांनी आता फ्रेममध्ये येऊन भूमीका घ्यावी - आशीष शेलार
मुंबई - टिपू सुलतान यांचे नाव मैदानाला देण्याचा घाट मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घातला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आता फ्रेममध्ये येऊन भूमीका घ्यावी, असे आव्हान भाजप आमदार आशीष शेलार यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
12:11 January 25
Breaking News: मंत्रालयाच्या मुख्य गेटवरील एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
मुंबई - मंत्रालयाच्या मुख्य गेटवरील तैनात एसआरपीएफ जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली. पुष्कर शिंदे असे त्या आत्महत्या केलेल्या ३६ वर्षीय जवानाचे नाव आहे. शिंदे हे मंत्रालयाच्या मुख्य गेटवर एसआरपीएफ गट क्रमांक 2 मध्ये तैनात होते. आज सकाळी 9 . 50 वाजता ही घटना घडली. शिंदे यांना तात्काळ जेजे रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिंदे हे 6 जानेवारी 2022 पासून मंत्रालयाच्या मुख्य गेटवर कर्तव्यावर होते.
11:40 January 25
तमाशाचे फड पुन्हा होणार सुरू, कलावंतामध्ये उत्साह
पुणे - कोरोनामुळे तमाशाचे फड बंद असल्याने कलावंतावर उपासमारीची वेळ आली होती. मात्र आता तमाशाचे फड 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्याला परवानगी दिल्याने कलावंतांमध्ये उत्साह संचारला आहे.
11:40 January 25
शेअर बाजारात पडझड सुरूच, सेंसेक्स 882 अंकाने कोसळला
मुंबई - शेअर बाजारात पडझड सुरूच असून सेंसेक्स 882 अंकाने घसरला. निफ्टीही 17 हजारावर खुला झाला आहे.
11:37 January 25
Breaking News: रेल्वेतून पडणाऱ्या तरुणास जवानाने वाचवले
पालघर - रेल्वेतून पडणाऱ्या तरुणास जवानाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. ही घटना विरार वसई परिसरात घडली आहे. जवानाने तरुणास जीवदान
10:31 January 25
Breaking News: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वात प्रथम शिवसेनेने निवडणूक लढवली - संजय राऊत
मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वात प्रथम शिवसेनेचे निवडणूक लढवली आहे. आता हे नवे हिंदू आले आहेत. त्यांच्या इतिहासाची काही पाने फाडली आहेत. मात्र वेळोवेळी आम्ही त्यांना माहिती देत राहू असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ते कार्टून मी काढलेले नाही. एका वृत्तपत्रात आर के लक्ष्मण यांनी ते प्रसिद्ध केले होते. भाजपने प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, पर्रिकर या सर्व कुटुंबांना अंधारात ठेवले. भाजपत हे कुटूंब कुठे आहेत, आता दिसत नाहीत असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात आम्ही यादी जाहीर केली आहे. पन्नास जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. सर्वांना एकत्र घेऊन दिल्ली काबीज करू असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
10:03 January 25
स्वयंम पाटीलला मिळालेल्या पुरस्काराने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला - छगन भुजबळ
नाशिक - स्वयंम पाटील याने क्रीडा प्रकारातील स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 देवून स्वयंम पाटीलला गौरविण्यात आले आहे. ही बाब नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी असल्याचे सांगत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वयंम पाटील व त्याच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना त्याच्या आईने स्वयंमला आजार असूनही तो उत्कृष्ट स्विमींग करू शकतो. त्यामुळे त्याचा अभिमान असल्याचे सांगितले.
09:07 January 25
Breaking News: राज्यावर धुक्याची 'चादर', थंडीने भरली हुडहुडी
मुंबई - राज्यावर धुक्याची दाट 'चादर' पसरली आहे. त्यामुळे सगळीकडे धुके असल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे थंडीने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मुंबईचे तापमान 16 अंशावर, पुण्यात पारा 10 अंशावर गेला आहे. नाशिकचे तापमान 5, निफाड 4.5, महाबळेश्वर 7, धुळे 4.5 अंशावर पोहोचले आहे.
08:15 January 25
Breaking News: जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात राडा, सदस्यांनी खुर्च्या तोडल्या
सांगली - जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात सदस्यांनी तोडफोड केली आहे. यावेळी सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पतीलाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
06:33 January 25
कार पुलाखाली कोसळून 7 विद्यार्थी ठार
वर्धा - कार पुलावरुन कोसळून 7 विद्यार्थी ठार झाल्याने खळबळ उडाली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा गावात घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्य सुरू झाले. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.