मुंबई - राज्यात ओमायक्राॅनच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने राज्य सरकार (State Government) सतर्क झाले आहे. तिसऱ्या लाटेचा (Third Covid Wave) सामना करण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर (Frontline Workers) आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Workers) बूस्टर डोस (Booster Dose) देण्यात यावा, सरसकट लसीकरणासाठी कोविड प्रतिबंधक दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय (Aditya Thackeray's letter to Union Health Minister) यांना याबाबत पत्र पाठविले आहे. यावर केंद्र शासन (Central Governemnt) काय निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.
पत्रात म्हटले आहे की, राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आले असतांना ओमायक्रॉनचा धोका वर्तवला जातो आहे. यामुळे फ्रंटलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देणे आवश्यक आहे. तसेच लसीकरणाचा आकडा वाढवण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 15 पर्यंत असावी, दोन डोसमधील अंतर किमान चार आठवड्यांपर्यंत करावे जेणेकरून सर्वांना लसीकरण करणे सोयीस्कर होईल.
नवीन नियमावली
कोरोनाच्या दोन लाटांचा सामना केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असताना, तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. महाराष्ट्रात विदेशातील ओमायक्राॅनचा फैलाव झपाट्याने होत आहे. आतापर्यंत ३९ संशयित रुग्ण आढळले असून, जीनोम स्क्विन्सिंगद्वारे (Genome Squinting) त्यांचे नमुने तपासले जात आहेत. तर तीनशेहून अधिक जण संशयितांच्या संपर्कात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रवासी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांसंदर्भात नवीन सूचना (New Notifications Regarding Travel And Public Health Facilities) जाहीर केल्या आहेत. नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
आदित्य ठाकरे यांचे केंद्राला पत्र
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध घालायचा असेल तर, लसीकरण मोहिमेवर भर द्यायला हवा. तसेच फ्रंटलाईन वर्कर, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यात यावा (Booster doses should be given to frontline workers and health workers). लसीकरणाचा टप्पा वाढवण्यासाठी वयोमर्यादा किमान पंधरा वर्षांपर्यंत ठेवावी. जेणेकरून प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना लस देऊन संरक्षित करता येईल. तसेच मुंबईत सुमारे शंभर टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 73 टक्केपेक्षा अधिक लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. परदेशात अभ्यास व काम करण्यासाठी जाणाऱ्यांसाठी दोन लसींमधील अंतर चार आठवड्यांचे केलेला आहे. याच धर्तीवर राज्यात लसींच्या अंतर चार आठवड्यांपर्यंत ठेवावे अशी मागणी मंत्री आदित्य ठाकरे आणि केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारने संबंधित नियमात बदल केल्यास जानेवारी 2022 पर्यंत शंभर टक्के लोकांच्या दोन्ही लसीकरण ध्येय पूर्ण करणे शक्य होईल, असा आशावाद मंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भातील पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांना पाठवले आहे.