मुंबई- मुंबईतील वाढती कोरोना, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ऑनलाइन पद्धतीने केवळ 3 तास खटल्यांच्या सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे. असल्याने मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या कामकाज समितीच्या बैठकीत आज मुंबई उच्च न्यायालयात 14 फेब्रुवारीपासून प्रमुख खंडपीठात सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 पर्यंत फिजिकल हिरींग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने कामकाज सुरू होते. कोर्टाचे कामकाज पूर्वीच्या SOP नुसार उच्च न्यायालयाच्या आवारात वावरण्याची याचिकाकर्त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. महिला आणि वृद्ध वकिलांना ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पाच तास कामकाज
मुंबईमध्ये रुग्णांची संख्या कमी असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने कामकाज 5 तास करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने काही कामकाज होणार आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या प्रशासकीय समितीची उच्च न्यायालय बार असोसिएशनसोबत एक तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. समितीने निर्णय घेतला की, वकील आणि याचिकाकर्त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कमी करण्यासाठी ऑनलाइनद्वारे काही प्रकरणांची सुनावणी केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.