मुंबई : एखाद्या महिलेने मैत्री केली ( friendship with woman ) असेल तर त्याचा अर्थ तिने त्या पुरुष मित्राला शरीरसंबंध ठेवण्यास परवानगी दिली असे नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) दिला आहे. अशाच एका प्रकरणात न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळून लावला आहे.
२२ वर्षीय तरुणीचा आरोप : या प्रकरणात तक्रारदार ही २२ वर्षीय तरुणी असून, ती आरोपीच्या ओळखीची होती. 2019 मध्ये ती मैत्रिणीसोबत मैत्रिणीच्या घरी गेली असता आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर तरुणीने यावर आक्षेप घेतल्यानंतर आरोपीने तिला पसंत असून, तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर आरोपीने अनेकवेळा तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
-
Friendship with a woman "does not confer a license upon" a man to force himself on her, says Bombay High Court while rejecting pre-arrest bail plea of a man accused of impregnating a woman on pretext of marriage
— Press Trust of India (@PTI_News) June 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Friendship with a woman "does not confer a license upon" a man to force himself on her, says Bombay High Court while rejecting pre-arrest bail plea of a man accused of impregnating a woman on pretext of marriage
— Press Trust of India (@PTI_News) June 27, 2022Friendship with a woman "does not confer a license upon" a man to force himself on her, says Bombay High Court while rejecting pre-arrest bail plea of a man accused of impregnating a woman on pretext of marriage
— Press Trust of India (@PTI_News) June 27, 2022
तक्रारीत म्हटलंय : पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर आरोपीने अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. मात्र पीडिता 6 आठवड्यांची गरोदर राहिल्यानंतर तिने आरोपीशी संपर्क साधला. मात्र आरोपीने मुलाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. एवढेच नाही तर आरोपीने मुलीच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले. ती दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप केला. मुलीने फिर्यादीत म्हटले आहे की, तिने आरोपींकडे लग्नासाठी वारंवार विनवणी केली, मात्र आरोपीने ऐकले नाही.
सन्मानाची अपेक्षा : प्रत्येक स्त्रीला नातेसंबंधात 'सन्मान' अपेक्षित असतो, जरी ती परस्पर स्नेहावर आधारित असली तरी. मात्र या प्रकरणात आरोपीने आधी मैत्री केली, नंतर लग्नाच्या बहाण्याने अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले, फिर्यादी गर्भवती राहिल्यावर आरोपीने तिच्यावर गंभीर आरोप केले, असे उच्च न्यायालयाने एका पुरुषाने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना म्हटले. निकाल देताना न्यायाधीश डांगरे म्हणाले की, सध्या स्त्री-पुरुष एकत्र काम करत असताना त्यांच्यात मैत्री होण्याची, जवळीक वाढण्याची किंवा दोघांचे विचार एकत्र येण्याची शक्यता असते. पण मैत्रीचा अर्थ असा नाही की स्त्री त्या पुरुषाला शारीरिक संबंध ठेवू देते.
असे आहे प्रकरण : आरोपी आणि तरूणीमध्ये मैत्रीपूर्ण संबध होते. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवत तरूणीशी संबध प्रस्थापित केले. संबधित तरूणी गर्भवती राहिल्यानंतर तरूणाने लग्न करण्यास नकार दिला. तरूणीने आरोपी विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तक्रारदार तरुणीच्या संमतीने आपण शारीरीक संबध ठेवले असल्याने आरोपीने अटकपूर्व जामीनीसाठी न्यायालयात धाव घेतली मात्र हा अर्ज न्यायमुर्ती भारती डोंगरे यांनी उपरोक्त मत नोंदवून त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणातील तरूणीवर शारिरीक संबध ठेवण्यास संमती देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता की नाही? याचा तपास करण्यासाठी आरोपीच्या कोठडी चौकशीची आवश्यकता असल्याचं सांगितलं.
लग्नाचे वचन दिले अन् ठेवले शरीरसंबंध : न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी सांगितलं की फिर्यादी तरुणीच्या मनात आरोपीबद्दल प्रेमभावना होत्या. पण तिच्या जबाबानुसार आरोपीने लग्नाचं वचन दिल्यापासूनच तिने शारीरिक संबंध करण्यास परवानगी दिली. लग्नाच्या वचनावरच अनेकदा शारीरिक संबंध झाले होते. मात्र जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हा त्याने तिला दोष दिला. त्यानंतरही आरोपीने तरुणीसोबत संबंध ठेवले.
न्यायालय म्हणाले : आजच्या या जगात जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र काम करत असतात तेव्हा असं होऊ शकतं की दोघांमध्ये काहीतरी भावना निर्माण होतील किंवा दोघेही एकमेकांना मित्र म्हणून पूरक वाटू शकतील. त्या मैत्रीला लिंगाचं बंधन नसतं. पण ही मैत्री झाली तर पुरुषाला कोणताही हक्क मिळत नाही की त्याने स्त्री नाही म्हणत असतानाही जबरदस्तीने तिच्याशी संबंध प्रस्थापित करावेत. प्रत्येक महिलेला नात्यामध्ये आदराची अपेक्षा असते. इथं हा आरोपी लग्नाचं वचन देत तरुणीशी संबंध ठेवत होता. पण जेव्हा तरुणी गरोदर राहिली तेव्हा त्याने पाठ फिरवल असं न्यायालयाने म्हटलं आहे.
हेही वाचा : Sangli suicide case : सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्याकांड; दोन मांत्रिकांनी दिलं जेवणातून विष