ETV Bharat / city

विशेष - मुंबईची मगरमिठीतून सुटका करण्यासाठी पालिका करणार १६०० कोटी रुपये खर्च - मुंबईला पुराच्या पाण्यातून वाचवण्यासाठी अॅक्शन प्लान

मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्यानंतर नदी परिसर जलमय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने मिठी नदीच्या ८ किलोमीटर परिसरात सुरक्षित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मिठी नदी परिसरातील २८ ठिकाणी सुरक्षित दरवाजे बसवण्यात येणार असून यासाठी १,६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून भारतातील पहिले तंत्रज्ञान मिठी नदीच्या परिसरात दरवाजे बसवण्यासाठी वापरले जाणार आहे. मुंबईतील पुराचे संकट टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

bmc to spend rs 1600 crore to save mumbai from floods
मुंबईची मगरमिठीतून सुटका करण्यासाठी पालिका करणार १६०० कोटी रुपये खर्च
author img

By

Published : Apr 26, 2022, 4:16 PM IST

मुंबई - २६ जुलै २००५ ला मिठी नदीने रौद्र रूप धारण केल्याने मुंबईत जलप्रलय आला होता. यात एक हजार नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर मिठी नदीने अनेकवेळा धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी पालिकेने अॅक्शन प्लान तयार केला आहे. परिसरातील नागरिकांना पुराचा तडाखा बसू नये यासाठी १६०० कोटी रुपये खर्च करून मिठी नदी परिसरातील २८ ठिकाणी सुरक्षित दरवाजे बसवण्यात येणार आहेत.

मुंबईला मिठीची मगरमिठी - मुंबईच्या पश्चिम उपनगरातून उगम पावणारी मिठी नदी बांद्रा बिकेसी कुर्ला पर्यंत येते. या विभागात अतिक्रमणामुळे मिठी नदीची रुंदी व लांबी कमी होत गेली. त्यामुळे पिण्यायोग्य असलेल्या मिठी नदीचे अस्तित्व धोक्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदी ओव्हर फ्लो झाली की परिसरातील नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे लागते. मुंबईत मोठा पाऊस पडला की मिठी नदी परिसरात दरवर्षी एनडੀआरएफला पाचारण करून बचाव मोहीम राबवावी लागते. मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्यानंतर नदी परिसर जलमय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने मिठी नदीच्या ८ किलोमीटर परिसरात सुरक्षित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मिठी नदी परिसरातील २८ ठिकाणी सुरक्षित दरवाजे बसवण्यात येणार असून यासाठी १,६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून भारतातील पहिले तंत्रज्ञान मिठी नदीच्या परिसरात दरवाजे बसवण्यासाठी वापरले जाणार आहे. मुंबईतील पुराचे संकट टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

काय आहे अँक्शन प्लान - मिठी नदी परिसरातील नागरिकांना मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्यानंतर होणारा त्रास दूर करण्यासाठी नदीच्या ८ किलोमीटर परिसरात २८ ठिकाणी दरवाजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर मिठी नदी परिसरात २८ ठिकाणी दरवाजे बसवलेले बंद करण्यात येतील. यामुळे नदीतील पाणी नदी शेजारील नाल्यात येणार नाही आणि परिसरातील नागरिकांना पुराचा तडाखा बसणार नाही. हाय टाईड असताना पावसाला सुरुवात झाली की दरवाजे बंद करण्यात येतील. यामुळे नदीतील पाणी नदीतचं राहिलं. हाय टाईड ओसरली की नदी शेजारील नाल्यातील पाणी पंपाद्वारे मिठी नदीत सोडण्यात येईल, असे वेलरासू यांनी सांगितले. समुद्राचे पाणी मिठी नदीत येते, अशा मिठी नदी परिसरातील २८ ठिकाणी दरवाजे बसवण्यात येणार आहेत. भारतातील प्रथमच मुंबईत अशा प्रकारे मिठी नदीच्या ८ किलोमीटर परिसरात सुरक्षित दरवाजे बसवण्यात येणार आहे.

पम्पिंग स्टेशन, ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प अपूर्ण - मुंबईचे व्यवस्थापन करणाऱ्या महापालिकेने नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करणे. ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प, पम्पिंग स्टेशन बांधले. तरीही अनेकवेळा मुंबईची तुंबई झाली. मात्र त्यावेळी समुद्राला मोठी भरती नसल्याने मुंबईकरांवर २६ जुलैसारखी परिस्थिती ओढवलेली नाही. पालिकेने सहा पम्पिंग स्टेशन उभारली असली तरी गेल्या १४ वर्षात मोगरा व माहुल पंपिंग स्टेशनचे काम मार्गी लावतात आलेले नाही.पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक बंद पडते. नागरिकांच्या घरात पाणी शिरते. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून मुंबईमध्ये साचणारे पावसाचे पाणी समुद्रात सोडता यावे म्हणून नाल्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय 1993 मध्ये पालिकेने घेतला. हा प्रकल्प "ब्रिमस्टोव्हेड" प्रकल्प म्हणून ओळखला जातो. 26 जुलै 2005 ला मुंबईत पावसाने हाहाकार उडवला होता. मुंबईत सर्वत्र पाणी साचल्याने 900 हुन अधिक नागरिकांचा जीव गेला होता. याची दखल घेत पालिकेने हा प्रकल्प गतीने राबवण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये "ब्रिमटोव्हेड" प्रकल्प राबवण्यास सुरुवात करण्यात आली त्यावेळी या प्रकल्पाची किंमत 1200 कोटी रुपये होती. या प्रकल्पाची किंमत तीन पटीने वाढून 1200 कोटी झाली आहे. तीन पटीने या प्रकल्पाची किंमत वाढली तरी पालिकेला हा प्रकल्प पूर्ण करता आलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.