ETV Bharat / city

Coronas Fourth wave : कोरोनाची चौथी लाट येणार... मुंबई पालिकेने टास्क फोर्सकडे केली मार्गदर्शनाची विनंती - मुंबई महापालिका टास्क फोर्स मदत

जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात कोरोनाची चौथी लाट ( coronas fourth wave in June 2022 ) येईल. या लाटेचा प्रभाव ऑक्टोबरपर्यंत ( coronas fourth wave control ) राहील. २२ जून ते २२ ऑक्टोबरपर्यंत ही लाट असणार आहे. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक रुग्ण आढळून येणार आहे. त्यानंतर चौथी लाट आटोक्यात येईल, असे आयआयटीने म्हटले ( IIT kanpur on corona 4th wave ) आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 4, 2022, 4:52 PM IST

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ( coronas third wave in control ) आटोक्यात आली आहे. रोज आढळून येणारी रुग्णसंख्याही कमी झाली आहे. अशातच कानपूरच्या आयआयटीने जूनमध्ये देशभरात कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचा ( coronas fourth wave prediction ) इशारा दिला आहे. याबाबत राज्याच्या टास्क फोर्सला मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून ( Task force help to BMC ) देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना -
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. काही दिवसातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. गेल्या दोन वर्षात मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. मुंबईकरांनी साथ दिल्याने तीनही लाटा आटोक्यात आणण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. सध्या सुमारे १०० रुग्ण रोज आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाची डिसेंबरमध्ये आलेली तिसरी आटोक्यात आली आहे.

हेही वाचा-Students Reached Mumbai : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत दाखल

ऑगस्टनंतर चौथी लाट आटोक्यात येईल-

जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात कोरोनाची चौथी लाट ( coronas fourth wave in June 2022 ) येईल. या लाटेचा प्रभाव ऑक्टोबरपर्यंत ( coronas fourth wave control ) राहील. २२ जून ते २२ ऑक्टोबरपर्यंत ही लाट असणार आहे. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक रुग्ण आढळून येणार आहे. त्यानंतर चौथी लाट आटोक्यात येईल, असे आयआयटीने म्हटले ( IIT kanpur on corona 4th wave ) आहे.

हेही वाचा-Bihar Blast Update : भीषण स्फोटात 3 मजली इमारत जमीनदोस्त, 12 जणांचा मृत्यू, अनेक ठिगाऱ्याखाली अडकले

टास्क फोर्सच्या सूचनांची अंमलबजावणी करू -
आयआयटीने चौथ्या लाटेबाबत दिलेल्या इशाऱ्याबाबत मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधला असता, कोरोना आटोक्यात असल्याने आम्ही कोविड सेंटर बंद करत आहोत. अशा परिस्थितीत चौथ्या लाटेबाबत आम्ही राज्याच्या टास्कफोर्सकडून मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. टास्क फोर्स याचा अभ्यास करून ज्या सूचना करेल त्या प्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा-Governor's Solapur Visit : राज्यपालांना पोलिसांनी गनिमी काव्याने पोहोचविले विद्यापीठात; आंदोलकांनी रोखला रिकामा ताफा

१० लाख ५६ हजार ७२९ रुग्णांची नोंद -
मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या एकूण १० लाख ५६ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३६ हजार ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६५० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५४४१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. २४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे.

२१ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण २१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात ३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.