ETV Bharat / city

अजबच! पायाने झाकण सरकवून गाय ड्रेनेज चेंबरमध्ये पडली, बीएमसीच्या अहवालात गायीवरच ठपका

गाय चेंबरमध्ये पडल्याचा अहवाल पालिकेच्या ( cow falling into the chamber ) जी नॉर्थ विभाग कार्यालयातील ( G North Division Office BMC ) घन कचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंता यांनी सहाय्यक आयुक्तांना सादर केला आहे. सकाळी ६.४५ वाजता गाय चेंबरमध्ये पडली होती. गायीला बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन ( rescue operation for Cow ) सुमारे ५ तास सुरू होते. त्यानंतर गायीला बाहेर सुखरुप काढले.

महापौर किशोरी पेडणेकर सोबत सुटका करण्यात आलेली गाय

author img

By

Published : Mar 28, 2022, 5:43 PM IST

मुंबई - दादर येथे एक गाय ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडल्याची घटना आज घडली. त्याचे चेंबरचे झाकण बाजूला काही अंतरावर पडल्याचे आढळून आले आहे. गायीनेच चेंबरवरील झाकण बाजूला केल्याचा अजब अहवाल घन कचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंत्यांनी सहाय्यक आयुक्तांना सादर केला.

गाय चेंबरमध्ये पडल्याचा अहवाल पालिकेच्या ( cow falling into the chamber ) जी नॉर्थ विभाग कार्यालयातील ( G North Division Office BMC ) घन कचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंता यांनी सहाय्यक आयुक्तांना सादर केला आहे. सकाळी ६.४५ वाजता गाय चेंबरमध्ये पडली होती. गायीला बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन ( rescue operation for Cow ) सुमारे ५ तास सुरू होते. त्यानंतर गायीला बाहेर सुखरुप काढले.

चेंबर
चेंबर

हेही वाचा-Power Board Employees Strike Nagpur : नागपुरात खासगीकरण विरोधात वीज कर्मचाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन

गायीच्या खुराने खोरल्याने झाकण हलले -
दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोड, राम मंदिर समोरील पुटपाथवर महेंद्रा कोटक एटीएम जवळ एका ड्रेनेजच्या चेंबरमध्ये एक गाय पडल्याची तक्रार सकाळी ६.४५ वाजता पालिकेच्या कंट्रोल रुमवरुन जी नॉर्थ विभाग कार्यालयाला देण्यात आली. त्यानुसार ७.१० मिनिटांनी अग्निशमन दल, पर्जन्य जल वाहिन्या, ड्रेनेज, घन कचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन गायीला चेंबरमधून बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामादरम्यान फुटपाथचे काम सुरू असल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. चेंबर व्यवस्थित असताना गाय पडली कशी याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली. गायीने खुराने चेंबरवरील झाकण खोरल्याने ते सरकले. त्यानंतर गाय रस्त्यावरील चेंबरमध्ये पडली. बाजूला काम सुरू असल्याने ते झाकण हलल्याची शंका नाकारता येत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

बीएमसी कर्मचारी
बीएमसी कर्मचारी

हेही वाचा-Indian Premier League: जगातील अनेक टी-20 लीगमध्ये आयपीएल आहे सर्वात आघाडीवर; काय आहे कारण, जाणून घ्या एका क्लिकवर

उपचार करून गायीला सुखरूप सोपवले -
अग्निशमन दल, पर्जन्य जल वाहिन्या, ड्रेनेज, घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी चालकाच्या साहाय्याने बाजूला ५ ते साडेपाच फूट खड्डा खणून त्या गायीला उभे करून दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. याबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. जी नॉर्थ विभागाचे आरोग्य अधिकारी विरेंद्र मोहिते यांच्या पथकाने गायीवर उपचार केले. त्यानंतर गाय सांभाळणाऱ्या व्यक्तीकडे सोपवण्यात आली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गायाली सुखरूप काढल्याबद्दल प्रशंसा केल्याचे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-Sharad Pawar on Kashmir Files : काश्मीर फाईल्सवरुन शरद पवारांची भाजपवर टीका; म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.