ETV Bharat / city

ड्रीम्स मॉल दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा - स्थायी समितीत मागणी - ड्रीम्स मॉल आग प्रकरण

भांडुप येथील ड्रीम्स मॉलला २६ मार्चला रात्री आग लागली. मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली व नंतर ती वरच्या मजल्यावर पसरली. या आगीत मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटरवर असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या आगीत ५ जण किरकोळ जखमी झाले होते. याचे पडसाद आज पालिकेच्या स्थायी समितीत उमटले.

BMC
मुंबई महापालिका
author img

By

Published : Mar 31, 2021, 10:01 PM IST

Updated : Mar 31, 2021, 10:55 PM IST

मुंबई - भांडुप ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत सनराईज हॉस्पिटलमधील ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी तसेच सध्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल हे दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे या आगीची सखोल चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली.

भांडुप येथील ड्रीम्स मॉलला २६ मार्चला रात्री आग लागली. मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली व नंतर ती वरच्या मजल्यावर पसरली. या आगीत मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटरवर असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या आगीत ५ जण किरकोळ जखमी झाले होते. याचे पडसाद आज पालिकेच्या स्थायी समितीत उमटले. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत आगीत झालेले ११ मृत्यू हे पालिकेच्या आणि अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा यामुळे झाल्याचा आरोप केला. आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली.

ड्रीम्स मॉल दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा

हेही वाचा-'ड्रीम मॉल'च्या आगीसाठी राज्य सरकार जबाबदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आरोप

आयुक्तांचे बेकायदेशीर कृत्य -
भंडारा आगीनंतर अग्निशमन दलाने १, ३२४ रुग्णालयांची तपासणी केली. त्यापकी ३७७ हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती. १८४ रुग्णालये बंद होती तर ६६३ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणेत त्रुटी आढळून आल्या आहेत. भांडुप येथील सनराईज हॉस्पिटलला तत्कालीन पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी एक व्हाटसअप ग्रुप बनवून विशेष बाब म्हणून एका दिवसात परवानगी दिली. मॉलला 'ना हरकत' नसताना त्याच मॉलमधील रुग्णालयाला 'ना हरकत' देण्यात आली. हे बेकायदेशीर कृत्य परदेशी यांनी केले. त्याबाबत इमारत प्रस्ताव विभागाने अशी परवानगी 'ना हरकत' देऊ नये असे स्पष्ट केले असतानाही परवानगी देण्यात आली. तसेच त्यावेळी आलेले आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडेही 'ना हरकत' रद्द करावी असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र त्यांनीही दुर्लक्ष केल्याने ११ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचे रवी राजा म्हणाले.

हेही वाचा-भांडुप येथील सन राईस रुग्णालयाला लागली आग, नऊ रुग्णांचा मृत्यू

दहा लाखांची आर्थिक मदत करा -
आगीला भ्रष्ट अधिकारी दोषी असल्याने त्यांची तक्रार मुख्यमंत्री व नगर विकास विभागाच्या सचिवांकडे करणार आहे. तसेच या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व पालिकेतील गटनेते रईस शेख यांनी केली. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही चौकशीची मागणी केली. तर या प्रकरणी चौकशी होऊ दे किंवा नको होऊ दे भाजप न्यायालयात जाईल असा ईशारा भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला. शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अग्निशमन दलात एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. यामुळे आगीला अग्निशमन दल अधिकरी जबाबदार असल्याने राज्य सरकार प्रमाणे पालिकेनेही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा -
भांडुप दुर्घटना गंभीर असून याप्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा. तसेच, जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मॉलवरही कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले. तसेच, वरळी येथील अट्रीया मॉलमधील बेकायदा बांधकामांची चौकशी करून त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.

Last Updated : Mar 31, 2021, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.