ETV Bharat / city

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : महापौर पेडणेकर घेणार मुंबईतील रुग्णालयांच्या अग्नीसुरक्षेचा आढावा - अग्नीसुरक्षेचा आढावा

भंडारा येथील सरकारी रुग्णालयात आग लागली होती. या आगीत नवजात १० बालकांचा मृत्यू झाला. त्याची दखल घेत मुंबईत असा प्रकार घडू नये म्हणून महापालिकेने शहरातील १३०० पैकी १ हजारहुन अधिक सरकारी, खासगी रुग्णालये, प्रसूती गृहे, दवाखाने यांनी फायर ऑडिट केले आहे कि नाही याची चौकशी सुरु केली. या सर्वाना अग्नीसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

mayor kishori pedanekar
महापौर पेडणेकर
author img

By

Published : Feb 10, 2021, 10:28 AM IST

मुंबई - भंडारा येथे सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभुमीवर मुंबईमधील हजाराहून अधिक असलेल्या सरकारी, खासगी रुग्णालये, प्रसूती गृहे, दवाखाने यांचे फायर ऑडिट केले जात आहे. त्यात सुमारे १२५ रुग्णालयांनी अग्नी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. याबाबतची बातमी 'ई टीव्ही भारत'ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या आज मुंबईतील कुपर, भगवती आणि बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयांची पाहणी करून अग्निसुरक्षेचा आढावा घेणार आहेत. महापौरांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईतील १ हजार रुग्णालयांना नोटीस -

मागील महिन्यात भंडारा येथील सरकारी रुग्णालयात आग लागली होती. या आगीत नवजात १० बालकांचा मृत्यू झाला. त्याची दखल घेत मुंबईत असा प्रकार घडू नये म्हणून महापालिकेने शहरातील १३०० पैकी १ हजारहुन अधिक सरकारी, खासगी रुग्णालये, प्रसूती गृहे, दवाखाने यांनी फायर ऑडिट केले आहे कि नाही याची चौकशी सुरु केली. या सर्वाना अग्नीसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शहरातील ६३९ रुग्णालयांमध्ये काही किरकोळ दुरुस्ती करण्याचे आवश्यक असल्याचे या तपासणीतून समोर आले. रुग्णालयांच्या रचनेसह सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोके असल्याचे ४० खासगी रुग्णालयांमध्ये आढळले, तर ३४२ रुग्णालयांमध्ये आग लागल्यास इमारतीबाहेर पडण्याच्या रस्त्यांमध्ये अडगळीच्या सामानामुळे जाण्यास रस्ता उपलब्ध नसणे, आग विझविण्याची साधने उपलब्ध नसणे किंवा असल्यास त्यांची मुदत संपलेली असणे इत्यादी धोके दिसून आले आहेत. यामुळे मुंबईतही रुग्णालयांना आग लागल्यास भंडाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कारवाई नाही अंमलबजावणी करून घेणार -

भंडारा आगीनंतर मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मुंबईमधील सरकारी, पालिकेची, खासगी रुग्णालये, प्रसूती गृहे आदीची तपासणी केली ज़ात आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार ते ११०० रुग्णालयांना नोटिस देण्यात आल्या आहेत. नोटीस दिल्यावर या रुग्णालयांची प्रयत्क्ष पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर ज्यांच्याकडे फायर सेफ्टी आहे पण कंप्लायन्स नाही, फायर सेफ्टी आहे कंप्लायन्स पण आहेत पण सी फॉर्म नाही, फायर सेफ्टी आणि कंप्लायन्स हे दोन्ही नाहीत असे तीन भाग करण्यात आले आहेत. या पाहणी दरम्यान मुंबईमधील १२५ रुग्णालयांकडे अग्नी सुरक्षा यंत्रणाच नसल्याचे समोर आले आहे. अग्नी सुरक्षा नसलेल्या छोट्या रुग्णालयांना आम्ही स्वता अग्निशमन यंत्रणा पुरवून भक्कम करणार आहोत. तर ज्या मोठ्या रुग्णालयांकडे ही यंत्रणा नाही त्यांना यंत्रणा कार्यरत करण्यासाठी भाग पाडणार असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख कैलास हिरवाळे यांनी दिली.

मुंबईमध्ये या आधी लागलेल्या आगी -

कोविड सेंटरमध्ये आग -
29 ऑक्टोबर 2020 ला मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या दहिसर कांदरपाडा परिसरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या कोविड रुग्णालयात अचानक आग लागली. अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. यावेळी घाबरून न जाता आणि प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.

अपेक्स रुग्णालयाला आग, एक मृत्यू -
मुलुंड येथील अपेक्स रुग्णालयात 12 ऑक्टोबर 2020 ला जनरेटरला आग लागली. अचानकपणे लागलेल्या या आगीत रुग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी रुग्णालयात जवळपास 40 रुग्ण उपचार घेत होते. या रुग्णालयातील रुग्णांना अनेक खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 3 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. पांडुरंग कुलकर्णी (82) या रुग्णाला देखील मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलं. मात्र, त्यांचा तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कामगार रुग्णालय आग -
17 डिसेंबर 2018 ला मुंबई अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर १४६ जण होरपळले असून जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ४७ जणांना रुग्णालयातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.