ETV Bharat / city

थुंकणे महागात! मुंबईकरांकडून २४ लाख ८९ हजारांचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४६१ अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – २००६’ तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने कार्यवाही करीत असते.

BMC fine for spitting in public places
नागरिकाला दंड
author img

By

Published : Apr 17, 2021, 6:52 AM IST

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने टीबी, कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. तरीही नागरिकांकडून अनेकदा सार्वजनिक ठिकाणी थुंकून इतरांचे आरोग्य धोक्यात आणले जाते. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १२ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून तब्बल रुपये २४ लाख ८९ हजार १०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक दंड वसुली कुर्ला एल विभागात; त्या खालोखाल कुलाबा फोर्ट येथील ए व सी विभागात करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४६१ अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – २००६’ तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने कार्यवाही करीत असते. याच उपविधीतील क्रमांक ४.५ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यां व्यक्तींकडून २०० रुपे इतका दंड वसुली करण्यात येतो. यानुसार गेल्या सुमारे ६ महिन्यांच्या कालावधीत रुपये २४ लाख ८९ हजार १०० इतका दंड वसुली करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्वाधिक दंड वसुली ही कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागातून करण्यात आली आहे. ती रुपये ३ लाख ५२ हजार ६०० इतकी आहे. या खालोखाल ‘ए’ विभागातून रुपये ०३ लाख २९ हजार ८००, तर ‘सी’ विभागातून रुपये ०२ लाख ३४ हजार ८०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

BMC fine
नागरिकाला दंड

हेही वाचा-'महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धोका नाही'

रस्त्यावर थुंकल्याने दंड -
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सुविधा देणारी महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील नियमितपणे घेत असते. या अंतर्गत आरोग्य सुविधा देण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंबही सातत्याने करण्यात येतो. याच अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई नियमितपणे करण्यात येते. जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तिीमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

कोणत्या विभागात किती दंड वसुली -
· ए विभाग - रुपये ३,२९,८००

· बी विभाग - रुपये १,३१,०००

· सी विभाग - रुपये २,३४,८००

· डी विभाग - रुपये ६६,४००

· ई विभाग - रुपये २०,०००

· एफ दक्षिण विभाग - रुपये २,१७,४००

· एफ उत्तर विभाग - रुपये ५०,६००

· जी दक्षिण विभाग - रुपये २६,०००

· जी उत्तर विभाग - रुपये २५,९००

· एच पूर्व विभाग - रुपये १,७१,४००

· एच पश्चिम विभाग - रुपये २५,८००

· के पूर्व विभाग - रुपये २७,०००

· के पश्चिम विभाग - रुपये ९५,६००

· पी दक्षिण विभाग - रुपये ६९,८००

· पी उत्तर विभाग - रुपये १,७९,२००

· आर दक्षिण विभाग - रुपये ३३,५००

· आर मध्य विभाग - रुपये ४३,८००

· आर उत्तर विभाग - रुपये ९४,८००

· एल विभाग - रुपये ३,५२,६००

· एम पूर्व विभाग - रुपये १९,२००

· एम पश्चिम विभाग - रुपये १,०१,२००

· एन विभाग - रुपये ७१,३००

· एस विभाग - रुपये ९०,४००

· टी विभाग - रुपये ११,६००

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.