ETV Bharat / city

BMC Election 2022 : मुंबईमधील झेब्रा क्रॉसिंगच्या रंगरंगोटीसाठी पालिका करणार ३५ कोटीचा खर्च - मुंबई महापालिका निवडणूक

मुंबईमधील रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगवरील रंग ( zebra crossing colouring work ) काही कालावधीत उडून जातो. यासाठीन पुन्हा झेब्रा क्रॉसिंगला रंगरंगोटी केली जाणार आहे. यासाठी पालिका तब्बल 35 कोटी ( Bmc Expenditure for Development Work Zebra Crossing ) रुपये खर्च करणार आहे.

BMC Election 2022
BMC zebra crossing work
author img

By

Published : Feb 16, 2022, 6:50 AM IST

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक ( BMC Election 2022 ) होणार आहे. या पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग आला आहे. मुंबईमधील रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगवरील रंग ( zebra crossing colouring work ) काही कालावधीत उडून जातो. यासाठीन पुन्हा झेब्रा क्रॉसिंगला रंगरंगोटी केली जाणार आहे. यासाठी पालिका तब्बल 35 कोटी ( Bmc Expenditure for Development Work Zebra Crossing ) रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

झेब्रा क्रॉसिंगला थर्मोप्लास्टिक रंग -

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व नंतर विकास कामे केली जातात. त्यात रस्ते नवीन बनवणे, त्यांचे सुशोभीकरण करणे आदी कामे केली जातात. पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते दुरुस्ती, काँक्रीटीकरण, डांबरीकरणासाठी २,२०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यंदा पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक खात्यातर्फे रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग, पादचारी क्रॉसिंग पट्टे आदींकडे थर्मोप्लास्टिक रंग देण्याचे काम केले जाणार आहे. थर्मोप्लास्टिक रंग दिला तरी त्याचा रंग काही दिवसातच उडून जातो. त्या कारणाने वाहतुकीसह पादचाऱ्यांच्या सुरक्षितेला बाधा येऊ शकते. त्यासाठी पालिकेकडून यंदाही झेब्रा क्रॉसिंगला रंग दिला जाणार आहे. यासाठी उणे दराने काम दिले जाणार असून येत्या शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत हे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.

उणे दराने रंगरंगोटीचे काम -

झेब्रा क्रॉसिंगला थर्मोप्लास्टिक रंग दिला जाणार आहे. परिमंडळ एकमध्ये रंगरंगोसाठी 5 कोटी 22 लाख रुपयांचा कार्यालयीन अंदाज खर्च मांडला होता. प्रत्यक्षात निविदेमध्ये सर्वात लघुत्तम ठरलेल्या उणे 26.30 टक्के दराच्या निविदेनुसार त्या कामासाठी कर, आकार मिळून 4 कोटी 24 लाख रुपये खर्च येणार आहे. परिमंडळ दोन (शहर विभाग) थर्मोप्लास्टिक रंग देण्यासाठी कार्यालयीन अंदाज खर्च 7 कोटी 85 लाख रुपये मांडला होता. त्यात सर्वात लघुत्तम म्हणजे उणे 24.54 टक्के दराने 6 कोटी 53 लाख रुपये खर्च येणार आहे. परिमंडळ तीन (पश्चिम उपनगर) विभागात पालिकेने 7 कोटी 85 लाख रुपये कार्यालयीन अंदाज खर्च तयार केला होता. त्या कामासाठी सर्वाधिक लघुत्तम उणे 33.75 टक्के दराने 5 कोटी 73 लाख रुपये खर्च येणार आहे. परिमंडळ-4 (पश्चिम उपनगर) विभागात उणे 32.50 टक्के दराने 5 कोटी 52 लाख रु. खर्च करुन थर्मोप्लास्टिक रंग दिला जाणार आहे.

परिमंडळ-5 (पूर्व उपनगर) विभागात रंगरंगोटीसाठी उणे 25.56 टक्के दराच्या निविदेनुसार 2 कोटी 52 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. परिमंडळ-6 (पश्चिम उपनगर)मध्ये उणे 34.81 टक्के दराने रंगरंगोटीसाठी 4 कोटी 84 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. तसेच, परिमंडळ-7 (पश्चिम उपनगर) येथे उणे 34.81 टक्के दराने 4 कोटी 84 लाख रु. खर्च करुन रंगरंगोटीची कामे केली जाणार आहेत.

हेही वाचा - Actor Deep Sidhu Died In Accident : लाल किल्ला हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.