मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ( Eknath Shinde's rebellion ) त्यांच्याकडे आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याचा त्यांनी केलेला दावा पाहता आता मध्यावधी निवडणुका ( Midterm elections ) की सत्तांतर हा प्रश्न आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे. मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे मात्र मंत्रिमंडळ राज्यपालांना विधानसभा बरखास्तीची सूचनाही करू शकते.
मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय - शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, मंत्रीमंडळ राज्यपालांना विधानसभा बरखास्तीची सूचनाही करू शकते. राज्यपाल यांनी बरखास्तीची सूचना मान्य करायची की भाजपला सत्तास्थापनेची संधी द्यायची हा निर्णय राज्यपालांचा असेल. सध्याची स्थिती पाहता भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.
शिंदे यांचा पन्नास आमदारांचा दावा - एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत 50 आमदार असल्याचा दावा केला आहे. यामध्ये शिवसेना अपक्ष आणि काँग्रेसच्या आमदारांचाही सहभाग असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदारांचा गट फोडण्यात बाजी मारली तर त्यांच्या गटाला मान्यता मिळू शकते आणि ही मान्यता मिळाल्यानंतर ते थेट भाजपात जाऊ शकतात. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता मावळून भाजपा सत्तेवर विराजमान होऊ शकते.
सरकार बरखास्तीची शक्यता - ज्या पद्धतीने शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री बोलत आहेत त्यानुसार राज्य सरकार बरखास्त होण्याची शक्यता अधिक आहे. राज्य सरकार बरखास्त झाले तर अधिवेशनात अविश्वास ठराव किंवा संख्याबळ सिद्ध करण्याची गरज लागणार नाही. संख्याबळ सिद्धतेसाठी हे सरकार सामोरे जाईल, अशी शक्यता नसल्याने सरकार बरखास्त होण्याची शक्यता अधिक आहे.
हेही वाचा - बंडखोर नेते एकनाथ शिंदे स्वतंत्र गट स्थापन करणार? 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा