ETV Bharat / city

उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन यांनी राखला गड - loksabha

पूनम महाजन यांना मतदानाच्या पहिली फेरीपासूनच आघाडी मिळाली होती. आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत त्यांनी काँग्रेसच्या दत्त यांचा दारुण पराभव केला.

उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन यांनी राखला गड
author img

By

Published : May 23, 2019, 8:56 PM IST

मुंबई - उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांनी आपला गड राखला. तब्बल १ लाख २५ हजार ९६४ मतांची आघाडी घेत काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा दुसऱ्यांदा दारुण पराभव केला.

पूनम महाजन यांना मतदानाच्या पहिली फेरीपासूनच आघाडी मिळाली होती. आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत त्यांनी काँग्रेसच्या दत्त यांचा दारुण पराभव केला.
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात आज एकूण २४ फेऱ्यांमध्ये मतांची मोजणी करण्यात आली. या मत मोजणीत ८ लाख 86 हजार 945 मतांपैकी पूनम महाजन यांना तब्बल चार लाख 77 हजार 765 मते मिळाली तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना 3 लाख 51 हजार 801 मते मिळवता आली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान अंजारिया यांनी शेवटच्या फेरीपर्यंत 33 हजार 67 मते मिळवली. पूनम महाजन यांनी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी होण्याचा मान मिळवला.

उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन यांनी राखला गड

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, कुर्ला आणि विलेपार्ले या मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली. विशेष म्हणजे मुस्लीम बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्ला विधानसभा मतदारसंघातून पूनम महाजन यांना यावेळी पहिल्यांदाच व मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याने त्याचा फटका प्रिया दत्त यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ही बसला. तर दुसरीकडे प्रिया दत्त यांना कुर्ल्यातील काही भाग त्यासोबतच चांदिवली विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली असली तरी त्या राहत असलेल्या वांद्रे पश्चिम भागातून मात्र मतदारांनी त्यांना फार पसंत केले नसल्याचे समोर आले आहे.

पूनम महाजन यांच्या यशामागे भाजपच्या अनेक नेत्यांसह स्थानिक शिवसेनेच्या अनेक आमदार नगरसेवकांचे हे मोठे योगदान मिळाले. त्यातच कुर्ला येथे असलेल्या हिंदुबहुल मतदारांनीही पूनम महाजनला मोठी पसंती दिल्याचे आजच्या मतमोजणी होऊन समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसापूर्वीच प्रिया दत्त यांना या मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे करण्यात आले होते. मात्र, त्यासाठी काँग्रेसकडून त्यांच्या प्रचारासाठीची कोणतीही प्रभावी अशी आखणी करण्यात आली नसल्याने त्यांना हा पराभव पत्करावा लागला असल्याचेही बोलले जाते. प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी केवळ चांदीवलीचे स्थानिक आमदार नसीम खान, माजी मंत्री कृपाशंकर सिंग आणि इतर पदाधिकाऱ्यांचा अपवाद सोडल्यास एकही काँग्रेसचा मोठा नेता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी उतरला नसल्याने त्याचा फटका प्रिया दत्त यांना बसला असल्याचे सांगितले जाते.

Intro:उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा भाजपच्या पूनम महाजन यांनी राखला गड,

मुंबई, 23 :

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन यांनी आपला गड राखला. तब्बल १लाख २५ हजार ९६४ मतांची आघाडी घेत काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा दुसऱ्यांदा दारुण पराभव केला.
पूनम महाजन यांना मतदानाच्या पहिली फेरी पासूनच आघाडी मिळाली होती. आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत त्यांनी काँग्रेसच्या दत्त यांचा दारुण पराभव केला.
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात आज एकूण २४ फेऱ्यांमध्ये मतांची मोजणी करण्यात आली. या मत मोजणीत ८ लाख 86 हजार 945 मतांपैकी पूनम महाजन यांना तब्बल चार लाख 77 हजार 765 मते मिळाली तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना 3 लाख 51 हजार 801 मते मिळवता आली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान अंजारिया यांनी शेवटच्या फेरीपर्यंत 33 हजार 67 मते मिळवली.
पूनम महाजन यांनी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी होण्याचा मान मिळवला.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, कुर्ला आणि विलेपार्ले या मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली. विशेष म्हणजे मुस्लिम बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्ला विधानसभा मतदारसंघातून पूनम महाजन यांना यावेळी पहिल्यांदाच व मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याने त्याचा फटका प्रिया दत्त यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ही बसला. तर दुसरीकडे प्रिया दत्त यांना कुर्ल्यातील काही भाग त्यासोबतच चांदिवली विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली असली तरी त्या राहत असलेल्या वांद्रे पश्चिम भागातून मात्र मतदारांनी त्यांना फार पसंत केले नसल्याचे समोर आले आहे.
पूनम महाजन यांच्या यशामागे भाजपाच्या अनेक नेत्यांसह स्थानिक शिवसेनेच्या अनेक आमदार नगरसेवकांचे हे मोठे योगदान मिळाले. त्यातच कुर्ला येथे असलेल्या हिंदुबहुल मतदारांनीही पूनम महाजनला मोठी पसंती दिल्याचे आजच्या मतमोजणी होऊन समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसापूर्वीच प्रिया दत्त यांना या मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे करण्यात आले होते. मात्र त्यासाठी काँग्रेसकडून त्यांच्या प्रचारासाठीची कोणतीही प्रभावी अशी आखणी करण्यात आली नसल्याने त्यांना हा पराभव पत्करावा लागला असल्याचेही बोलले जाते. प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी केवळ चांदीवलीचे स्थानिक आमदार नसीम खान, माजी मंत्री कृपाशंकर सिंग आणि इतर पदाधिकाऱ्यांचा अपवाद सोडल्यास एकही काँग्रेसचा मोठा नेता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी उतरला नसल्याने त्याचा फटका प्रिया दत्त यांना बसला असल्याचे सांगितले जाते.

Body:उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा भाजपच्या पूनम महाजन यांनी राखला गड, Conclusion:उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा भाजपच्या पूनम महाजन यांनी राखला गड,
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.