मुंबई : भाजपचे आमदार तमील सेल्वन यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. झेंडा लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादादरम्यान त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.
मुंबईत मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. झेंडा लावण्याच्या कारणावरून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपचे आमदार तमील सेल्वन यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. दरम्यान, भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने मंगळवारी राज्यभरात विविध ठिकाणी भाजपकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तमील सेल्वन हे सायन-कोळीवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत.
हेही वाचा - 'नैतिकतेची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीचीच आहे का?'