ETV Bharat / city

Babanrao Lonikar : मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्प सरकारने गुंडाळला - बबनराव लोणीकर - Babanrao Lonikar Attack on Govt

गेल्या पाच अधिवेशनात वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत ( marathwada water grid project ) राज्य सरकारने केवळ आश्वासने दिली. वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी 200 कोटी देण्याचे आश्‍वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. याउलट वॉटर ग्रीड प्रकल्प राज्य सरकारने गुंडाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

Babanrao Lonikar
बबनराव लोणीकर
author img

By

Published : Mar 23, 2022, 2:15 PM IST

मुंबई - गेल्या पाच अधिवेशनात वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत ( marathwada water grid project ) राज्य सरकारने केवळ आश्वासने दिली. वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी 200 कोटी देण्याचे आश्‍वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. याउलट वॉटर ग्रीड प्रकल्प राज्य सरकारने गुंडाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर ( Babanrao Lonikar Allegation on Government ) यांनी केला आहे. राज्य सरकारने वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा सुरू करावा. त्यासाठी मराठवाड्यामधील भारतीय जनता पक्षाच्या दहा आमदारांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. वॉटर विद्युत प्रकल्प राज्य सरकारने पुन्हा सुरू करावा अशा सूचना राज्य सरकारला राज्यपालांनी द्याव्यात अशी विनंती या सर्व आमदारांनी केली. याबाबत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी विधान भवन परिसरामध्ये प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

राज्यसरकारला पाप फेडावे लागतील - नेहमीच दुष्काळग्रस्त भाग म्हणून मराठवाड्याकडे पाहिले जाते. वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे मराठवाड्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत, शेतापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचल जाणार होते. या प्रकल्‍पासाठी खास ऑस्ट्रेलिया, इजराइल या देशातील तंत्रज्ञान विकसित करून प्रकल्प राबवला जाणार होता. या प्रकल्पामुळे मराठवाड्याचा कायमचा दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागला असता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार त्यांना मराठवाड्याचा दुष्काळ दूर करायचा नाहीये. त्यामुळे या प्रकल्पाला राज्य सरकार विरोध करते. राज्य सरकारने केलेल्या हे पाप त्यांना नक्की फेडावे लागतील असा इशारा बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - Ashish Shelar : केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणाचे वसूलीचे षडयंत्र - आशिष शेलार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.