ETV Bharat / city

'तो' गुन्हा रद्द करण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर यांची उच्च न्यायालयात धाव

author img

By

Published : Feb 17, 2022, 10:35 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो रद्द करण्यात यावा म्हणून दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने आज प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.

BJP leader Pravin Darekar
भाजप नेते प्रवीण दरेकर

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य शिरूर येथील एका कार्यक्रमात बोलताना राज्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केले होते. दरेकर यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षातील महिलांनी निषेध नोंदवला होता. या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो रद्द करण्यात यावा म्हणून दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने आज प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.

हेही वाचा - Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; शुक्रवारपासून 36 नवीन लोकल फेऱ्या वाढणार, पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

दरेकर यांना केलेल्या वक्तव्याबाबत महिलांची माफी मागण्यासही सांगितले होते. मात्र, दरेकरांनी माफी मागितली नाही. दरेकरांनी महिलांचा अनादर करत बेताल वक्तव्य केले असून या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार दरेकर यांच्यावर सीआरपीसी 482 आणि आयपीसी 509 या कलामांतर्गत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा रद्द करण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. याचिकेची दखल घेत खंडपीठाने राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर या प्रतिवाद्यांना नोटीस बजावत सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

हेही वाचा - Congress Leaders Meet CM Thackeray : निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - नाना पटोले

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.