ETV Bharat / city

या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना, चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल - chitra wagh news

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर सापडलेल्या मोटारीचा मालक मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी (दि.5 मार्च) मृतदेह आढळून आला. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल ना, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

chitra wagh
चित्रा वाघ
author img

By

Published : Mar 6, 2021, 3:53 PM IST

Updated : Mar 6, 2021, 4:17 PM IST

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर सापडलेल्या मोटारीचा मालक मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी (दि.5 मार्च) मृतदेह आढळून आला. त्यानंतर याचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यातच आता या प्रकरणात भाजपच्या इतर नेत्यांनी उडी मारली आहे. महाराष्ट्र्रात एकामागून एक प्रकरणे बाहेर येत आहेत, या सर्व प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल ना, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

चित्रा वाघ यांनी केलेले ट्विट
चित्रा वाघ यांनी केलेले ट्विट

भाजप आक्रमक

प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर 25 फेब्रुवारी सायंकाळी काळ्या रंगाची बेवारस मोटार आढळून आली होती. यात जिलेटीनच्या 20 कांड्या आढळून आल्या होत्या. चौकशीनंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन असल्याची माहिती पुढे आली होती. तसेच मनसुख हिरेन यांच्या जीवाला धोका असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. शुक्रवारी (दि. 5) ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत सापडला होता. मनसुख हिरेन यांचा मृतदेह घेण्यासाठी मनसुख धीरेन यांच्या नातेवाइकांनी नकार दिला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल जाहीर करा, शवविच्छेदन करतानाचा व्हिडिओ सार्वजनिक करा आणि मगच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास व्यवस्थित न झाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानभवनात उमटले होते. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे नाव पुढे करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यावा, अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा - मुकेश अंबानी प्रकरणाचा तपास सचिन वझे यांच्याकडे नाही - गृहमंत्री अनिल देशमुख

निष्पक्ष चौकशी होईल ना ?

मनसुख हिरेन प्रकरणी भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाचे सर्वच नेते या प्रकरणी सरकारला धारेवर धरत आहेत. त्यात आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे. पुण्यातील पूजा चव्हण मृत्यू प्रकरणी राज्यातील मंत्री संजय राठोड यांच्यावर वाघ यांनी थेट आरोप केले होते. वाघ यांनी हे प्रकरण लावून धरले होते. राठोड यांचा या प्रकरणी राजीनामा घेण्यात आला आहे. त्यानंतर आता मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही वाघ यांनी सरकारला धारेवत धरण्यास सुरुवात केली आहे. “महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

हेही वाचा - पोलीस आयुक्तांसोबत सचिन वझेंची 3 तास बैठक; नियमित बैठक असल्याची वझेंची माहिती

हेही वाचा - 'मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधीपक्षाने प्रश्न उपस्थित केले असतील, तर त्याचा तपास व्हायला हवा'

Last Updated : Mar 6, 2021, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.