मुंबई - मागील २ वर्ष महाराष्ट्रात कोरोना महामारीचे भयानक संकट असताना तसेच सामान्य जनता आरोग्य सुविधांसाठी धडपड करत असताना मंत्र्यांनी मात्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत. विशेष म्हणजे या लाखो रुपयांच्या खर्चाचे बिल सरकारी तिजोरीतून भरण्यात आली आहेत. महाविकास आघाडीच्या १८ मंत्र्यांनी ( Corona bill of 18 ministers of Mahavikas Aghadi ) हे उपचार घेतले आहेत व त्यासाठी सरकारी तिजोरीतून करोडो रुपये अदा केले आहेत. या सर्व मंत्र्यांचा एकूण खर्च हा १ कोटी ३९ लाख रुपये ( total treatment cost of the ministers Rs. 1 crore 39 lakhs ) इतका झाला आहे. माहिती अधिकारांमध्ये हे माहिती प्राप्त झाली आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या मंत्र्यांचा सरकारी वैद्यकीय सेवेवर अविश्वास का आहे? असा प्रश्न भाजपा नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी उपस्थित केला आहे. ते मुंबईत बोलत होते.
'सरकारी पैशाची लयलूट का?' : या विषयावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की याला जनद्रोह म्हणायचे का. करोना काळात सामान्य जनतेला बेड भेटत नव्हते. सरकारी इस्पितळात बेड भेटला म्हणजे त्यांना स्वर्ग सुखाचा आनंद वाटायचा. अशा प्रसंगी मंत्र्यांनी मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. सरकारी पैशाची लयलूट का केली. केली तरी तुमचा तुमच्याच सरकारी वैद्यकीय सेवेवर विश्वास नव्हता का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर आता याचे उत्तर मंत्र्यांनीच द्यावे असेही ते म्हणाले.
'याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श राखला!' : एकीकडे कोरोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यामुळे शेलार यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे त्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली आहे. ते म्हणाले की, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा त्यांना कोरोना झाला तेव्हा ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले व तेथे त्यांनी उपचार केले. यावरून त्यांनी आपल्याच सरकारी रुग्णालयावर विश्वास दाखवला परंतु सरकारमधील मंत्र्यांचा त्यांच्याच सेवेवर अविश्वास आहे. ऑक्टोंबर २०२० मध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले होते. मला कोरोनाची लागण झाली तर मला सरकारी रुग्णालयात दाखल करा, असे त्यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांना अगोदरच सांगितले होते. म्हणूनच याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श राखला, असे शेलार म्हणाले. या उपचार घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक ९, काँग्रेसचे ६ तर शिवसेनेच्या ३ मंत्र्यांचा समावेश आहे.
खासगी रुग्णालयात उपचार घेणारे टॉप - १० मंत्री व त्यांच्या बिलाची रक्कम :
१) राजेश टोपे, आरोग्य मंत्री - ३४ लाख ४०९३० रुपये
२) डॉ. नितीन राऊत, उर्जामंत्री - १७ लाख ६३८७९ रुपये
३) हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री - १४ लाख ५६६०४ रुपये
४) अब्दुल सत्तार, महसूल राज्यमंत्री - १२ लाख ५६७४७ रुपये
५) जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री - ११ लाख ७६२७८ रुपये
६) छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री - ९ लाख ३४०१ रुपये
७) सुनील केदार, पशुसंवर्धनमंत्री - ८ लाख ७१८९० रुपये
८) जयंत पाटील, जलसंपदामंत्री - ७ लाख ३०५१३ रुपये
९) सुभाष देसाई, उद्योग मंत्री - ६ लाख ९७२९३ रुपये
१०) अनिल परब, परिवहनमंत्री - ६ लाख ७९६०६ रुपये
आठ रुग्णालयात 'या' मंत्र्यांनी घेतले उपचार त्याची बिले खालील प्रमाणे :
बॉम्बे हॉस्पिटल - ४१ लाख, लीलावती हॉस्पिटल - २६ लाख, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल- १५ लाख, जसलोक हॉस्पिटल - १४ लाख, फोर्टिस हॉस्पिटल- १२ लाख, अवंती हॉस्पिटल- ७ लाख, ग्लोबल हॉस्पिटल- ४लाख
हेही वाचा - Krishna Prakash Transferred : 'कृष्ण प्रकाश' यांची उचलबांगडी; 'हे' असतील नवे पोलीस आयुक्त