मुंबई - महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असे वेळोवेळी भाकीत भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, आता सत्तेची आस जोडून, जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याचे आवाहन देवेंद्र फडणीस यांनी केले आहे. कारण भाजपाचे आरोप आणि आघाडी सरकार मधील तिन्ही पक्षांची असलेली सुसूत्रता आघाडी सरकार भक्कम झाल्याचे मतं विश्लेषकांनी कडून व्यक्त केले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना राज्यातील जनतेच्या प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केलं. भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येईल किंवा नाही याची वाट आता कार्यकर्त्याने पाहू नये. सत्ता यायची असेल तेव्हा येईल. मात्र आता जनतेसाठी अंतिम लढाई करण्यासाठी तयार राहा असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यामध्ये आता भाजप सरकार येण्याची शक्यता पूर्णपणे संपली का? असा सवालही उपस्थित केला जातोय. राज्य सरकार प्रत्येक मोर्चावर अपयशी झालेला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी समाजाचे प्रश्न, इंधन दरवाढ याबाबत आघाडी सरकारला कोणतेही घेणंदेणं नाही. केवळ भ्रष्टाचार करणारे एकच लक्ष महा विकास आघाडी सरकारचा आहे. राज्यात मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अंतिम लढाई लढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरावे लागेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
आघाडीला दोन वर्षाचा काळ
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षाचा काळ पूर्ण होतोय. मात्र शिवसेनेने भारतीय जनता पक्ष सोबत युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापना भारतीय जनता पक्षाच्या पचनी पडलं नव्हतं. गेल्या दोन वर्षात अनेक वेळा महा विकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार होईल याबाबत भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळे भाकीत करण्यात आले. केंद्रीय मंत्री असणारे नारायण राणे यांनी तर केवळ शंभर दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल असे भाकीत केले होते. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार सत्तेतून पायउतार होईल असे सांगण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसूत्रता
महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासोबतच आघाडी सरकारमध्ये सामील असलेले तिन्ही पक्ष एकमेकांना पूरक असं वातावरण तयार करत आहेत. राज्यातल्या प्रत्येक महत्त्वाचा निर्णय चर्चेतून घेतला जातोय. तसेच राज्य समोर आलेल्या प्रत्येक आव्हानाला तिन्ही पक्ष चर्चेतून मार्ग काढत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा मसलत करूनच सरकार चालवत असल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट जाणवत नाही. याची कल्पना भारतीय जनता पक्षाला देखील आली असून, आता हे सरकार जाण्याची शक्यता नसल्याचं भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आल आहे. म्हणूनच सत्तेची आस सोडून जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याचा आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले असल्याचे मतं राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले.
भाजपाच्या आक्रमणामुळे तिन्ही पक्ष मजबूत
महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर आरोपांचा भडीमार करत आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर वेळोवेळी दबाव आणला जातो. त्यातील काही पक्षांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून जेवढी आक्रमणे तिनी पक्षावर होत आहेत. त्या आक्रमणामुळे तिन्ही पक्ष अजून मजबूत होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे भाजपने केंद्रीय सत्तेचा कितीही वापर केला तरी, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल. तसेच भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांमुळे हे तिन्ही पक्ष अजून मजबूत झाले असल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे.