ETV Bharat / city

महाराष्ट्रात भाजपचे मिशन 45, मोक्याच्या लोकसभा मतदारसंघांवर नजर - BJP is eyeing key Lok Sabha constituencies

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे Mission 45 in Maharashtra. खासकरून महाराष्ट्रात झालेल्या राजकीय चढउतारानंतर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 45 लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाली आहे BJP is eyeing key Lok Sabha constituencies.

महाराष्ट्रात भाजपचे मिशन 45
महाराष्ट्रात भाजपचे मिशन 45
author img

By

Published : Sep 14, 2022, 3:16 PM IST

Updated : Sep 14, 2022, 7:46 PM IST

मुंबई - 'मिशन 45' ची तयारी भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या मतदार संघासोबतच इतर पक्षाच्या मतदार संघावर देखील भाजपने चाचपणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. खासकरून महाराष्ट्रात झालेल्या राजकीय चढउतारानंतर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 45 लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 45 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून यावे याबाबतची चाचपणी करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली होती. त्यामध्ये 41 खासदार निवडून आले होते. भारतीय जनता पक्षाचे 23 तर शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. मात्र यावेळी 45 खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य भारतीय जनता पक्षाने ठेवले आहे. नुकतेच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मुंबई दौरा केला. यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी कामाला लागायच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. मात्र महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. महाराष्ट्रातून 45 खासदार लोकसभेत जातात याची कल्पना भाजपाच्या ज्येष्ठ नेते मंडळींना आहे. त्यामुळे लोकसभा मतदार संघातील त्यांच्याकडून मतदार संघाची बांधणी सुरू झाली आहे.

मिशन 45 साठी केंद्रीय मंत्र्यांना जबाबदारी - महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 45 खासदार निवडून आणण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाने आखली आहे. यासाठी केंद्रीय मंत्र्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मिशन 45 अंतर्गत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे सध्या कल्याण डोंबिवली या परिसरात बैठकांचे सत्र घेत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा आहे. मात्र एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून चाचापण्या सुरू आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष लक्ष घालत असल्याने राजकीय चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.

बारामतीवर भाजपची नजर - पवार कुटुंबियाची मक्तेदारी असलेला बारामती लोकसभा मतदारसंघावर खासकरून भारतीय जनता पक्षाची नजर आहे. यासाठीची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आलेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बैठकांसाठी दोन दिवसाचा दौरा केला जाणार आहे. यासोबतच केंद्रीय कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री किरण रिजुजी यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट मिळून मिशन 45 करणार - भारतीय जनता पक्षाचे मिशन 45 हे केवळ भाजपचे नाही तर शिवसेना शिंदे गट मिळून मिशन 45 पूर्ण करतील. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांकडून काही लोकसभा मतदारसंघात लक्ष घातलं जात असले तरी, या मतदारसंघातून एकत्रित रित्या निवडणूक लढवली जाईल असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मिशन 45 वर दिलं आहे.

या मतदारसंघात भाजपाचे खास लक्ष - लोकसभा मतदारसंघापूर्वी मिशन 45 साठी ठाकरे गटाच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. तर तेथेच एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघातही केंद्रीय मंत्र्यांची दौरे आखण्यात आले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघ- सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ- प्रतापराव जाधव, एकनाथ शिंदे गट
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ- बाळू धानोरकर, काँग्रेस
हिंगोली मतदारसंघ- हेमंत पाटील, शिंदे गट
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ- इम्तियाज जलील, एम आय एम
पालघर लोकसभा मतदारसंघ- राजेंद्र गावित एकनाथ -शिंदे गट
कल्याण लोकसभा मतदारसंघ- श्रीकांत शिंदे , एकनाथ शिंदे गट
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ- राहुल शेवाळे, एकनाथ शिंदे गट
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ- अरविंद सावंत, शिवसेना
रायगड लोकसभा मतदारसंघ- सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
शिरूर लोकसभा मतदारसंघ -अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस
सातारा लोकसभा मतदारसंघ- श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ- विनायक राऊत, शिवसेना
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ- संजय मंडलिक, एकनाथ शिंदे गट
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ- धैर्यशील माने, एकनाथ शिंदे गट

या लोकसभा मतदार संघावर भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. सध्या कल्याण लोकसभा मतदार संघातून भाजपने केंद्रीय नेतेमंडळी पाठवायला सुरूवात केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सध्या या मतदार संघात आढावा घेत आहेत. लवकरच राज्यातील इतर लोकसभा मतदार संघात देखील केंद्रीय नेते मंडळी आढावा घेणार आहेत.

भाजपचे बारामती जिंकायचे स्वप्न स्वप्नच राहणार - मिशन ४५ अंतर्गत भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या लोकसभा संघाची चाचपणी केली जात आहे. यामध्ये खास करून सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे विजयाचे मनसुबे आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाला बारामती लोकसभा मतदारसंघ कधीही जिंकता येणार नाही. भाजपचे हे स्वप्न स्वप्नच राहील सुप्रिया सुळे यांनी केवळ राजकारण नाही. तर, समाजकारणही केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा मतदारसंघ बांधला आहे. या मतदारसंघातील मतदारांना देखील त्यांचं हित कोठे आहे हे माहीत आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी बारामती मतदारसंघ भाजपाला कधीही जिंकता येणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Sep 14, 2022, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.