मुंबई आरे जंगलामधील आदिवासी पाड्यांमध्ये वैद्यकीय कचरा आढळलेला आहे. हा वैद्यकीय कचरा आरे जंगलामधील आरे डेरीच्या कर्मचाऱ्यांसाठी जे छोटेखानी हॉस्पिटल तेथील असल्याचे समजते. यासंदर्भात नागरिकांनी सातत्याने मागणी करूनही त्या ठिकाणी कचरा टाकला जातो. यामुळे पर्यावरणाला हानी होणारच ( Environment Harm ) आहे. शिवाय मानवी वस्ती असल्यामुळे त्यांनाही याचा धोका आहे.
जंगलात 27 आदिवासी पाडे कोरोनाच्या काळानंतर वैद्यकीय कचरा याबद्दल बऱ्यापैकी जनतेच्या मनामध्ये प्रबोधन झालेल आहे. मात्र आरोग्य यंत्रणेत अद्यापही त्याबाबत जागरूकता दिसत नाही. ही बाब आरे जंगलात जे वैद्यकीय कचरा तो ही उघड्यावर पडलेला आहे. त्यावरून लक्षात यावं. आरे जंगलात 27 आदिवासी पाडे आहेत. अंदाजे 10 हजाराच्या जवळपास आदिवासी लोकसंख्या निवास करते. त्यातील महापालिका शाळेपासून चालत 500 मीटर अंतरावर आदिवासीच्या घराजवळ वैद्यकीय कचरा टाकलेला आढळला.
याबाबत आदिवासी भागातील कार्यकर्ते मोगा यांना विचारले असता, त्यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद करतांना माहिती दिली आहे. अनेक महिने झाले आमच्या घराजवळ हा मेडिकल कचरा असतो. तसेच हा कचरा आरे देवरीसाठी जे छोटेखानी रुग्णालय शासनाने पूर्वीपासून बांधलेले आहे. त्या दवाखान्यात काही रुग्ण रोज येतात. त्यांच्यावर औषधं उपचार केल्यावर उरलेला सर्व कचरा आदिवासी पाड्याजवळ मानवी वस्तीजवळ आणून टाकतात. कित्येकदा संबंधित डॉक्टर मंडळींना तक्रार केली. मात्र उपयोग होत नाही. इथे लहान बालके खेळतात. आमचे जनावर असतात. शेवटी पर्यावरणाला देखील हानी होते.
प्रदूषण टाळण्यासाठी कडक कायदा इंडियन कोन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हे संस्थेचे माजी अध्यक्ष आणि डॉ अविनाश भोंडवे यांना ईटीव्हीद्वारे संवाद केला असता, त्यांनी याची गंभीरता समोर आणली. त्यांनी सांगितले की भारत सरकारने फार आधी पासून जैव वैद्यकीय कचरा पासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कडक कायदा केला आहे. भारतीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली अंतर्गत देशात या प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ते प्रयत्न करतात. कोणत्याही मानवी वस्ती किंवा मानवी वस्ती नसली, तरी जैव वैद्यकीय कचरा हा घातक आहे. यावर स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई महापालिका तसेच महाराष्ट्र शासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याची जबाबदारी आहे, की त्यांनी याला प्रतिबंध करावा.
कायदेशीर प्रक्रिया मुंबईतील पूर्व उपनगरे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी देखील असे काही होत असेल, तर ते नियमांचे उल्लंघन आहे. तसेच आमच्याकडे या कचरा विल्हेवाट करिता शासनाने निधी दिला आहे. मात्र संबंधित रुग्णालयाने त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया केली, की कचरा विल्हेवाट यंत्रणा उभी राहू शकते. महापालिका गोरेगाव पूर्व पी साउथ प्रभाग सहाय्यक आयुक्त राजेंद्र आकरे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधले असता ते म्हणाले आहेत. हे नियमाचे उल्लंघन आहे. याच्यावर तात्काळ आम्ही इंजिनीयर आणि इतर कर्मचारी व्यक्तींना पाठवून कारवाई, करण्यासंदर्भात सूचना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.