ETV Bharat / city

Big Breaking news Live Page : वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर - आजच्या ब्रेकिंग न्यूज

Big Breaking news
ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Nov 20, 2021, 10:42 AM IST

Updated : Nov 21, 2021, 10:33 PM IST

22:31 November 21

नाशिक : पोलीस पुत्राचा खून, काही दिवसांपूर्वीच जामीनावर सुटला होता

नाशिक - म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत पोलीस पुत्राचा खून

-  प्रवीण गणपत काकड खून झालेल्या युवकाचे नाव

- मयत प्रवीणची झाली होती काही दिवसांपुर्वी जामीनावर मुक्तता

- मयत प्रवीण होता सराईत गुन्हेगार

- खून खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे मयत प्रवीण काकडवर दाखल 

22:33 November 20

हिंजवडीत पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवाराकडून इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवलेला फेस मास्क जप्त

पिंपरी चिंचवड पोलिसांनी काल हिंजवडी येथे पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवाराकडून इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवलेला फेस मास्क जप्त केला.

19:36 November 20

27 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे MSTRC चे 279 कोटी रुपयांचे नुकसान

27 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे MSTRC चे 279 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे: MSRTC (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ)

15:18 November 20

खासदार भावना गवळी यांना ईडीचे पुन्हा समन्स

शिवसेना नेत्या तथा खासदार भावना गवळी यांना ईडीचे पुन्हा समन्स
24 नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितले
यापूर्वीही दोन समन्स ईडीने भावना गवळी यांना दिलेले होते

14:50 November 20

हिंगोली जिल्ह्यात पकडले 19 किलो चंदन; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली - वसमत तालुक्यात दुचाकीसह 19 किलो चंदन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

11:21 November 20

तर त्यांच्यासाठी शोकसभा घेऊ - संजय राऊत

गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी दबावात होता. त्या जोखडातून बाहेर निघाला आहे.  शेतकऱ्यांना गुलाम करण्याचा हा कायदा होता. गुंड पाठवले मात्र शेतकरी मागे हटला नाही. जालियनवाला बागेत ईस्ट इंडिया कंपनीने गोळ्या घातल्या तसच शेतकऱयांच्या अंगावर गाड्या घालून चिरडले, असे संजय राऊत म्हणाले.  तसेच कृषी कायदे रद्द झाल्याने भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना शोक वाटत असेल तर त्यांच्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेंव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर मानसिकता तपासावी लागेल, अशी टीका संजय राऊत म्हणाले. 

10:39 November 20

रविकांत तुपकर यांनी आंदोलन घेतले मागे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर नागपुरातील संविधान चौकात अन्नत्याग सत्याग्रहाला बसले होते. मात्र पोलिसांनी अटक करून त्यांना बुलडाण्यात आणले. त्यांचा  सत्याग्रह बुलडाण्यात सुरू होता. सोयाबीनला 8 हजार तर कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली होती. अखेर आज त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. 

10:39 November 20

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये सरावली गावातून नऊ अवैध बांगलादेशी स्थलांतरितांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट २ ने दिली.

10:36 November 20

शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते, तर मग मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकविले? - सामना

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वादग्रस्त असलेले तिन्ही कृषी कायदे (Farm Law) रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावरून आज सामनाच्या अग्रलेखातून (Samana Editorial) टीका करण्यात आली आहे. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेले हे शहाणपण आहे, असा टोला भाजपला लगावला आहे. तसेच शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते, तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकविले? हा प्रश्नही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

09:34 November 20

Big Breaking news Live Page : वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

अमरावती - शहरामधील संचारबंदीत आणखी शिथीलता देण्यात आली आहे.  आजपासून संपुर्ण मार्केट खुले करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत व्यवहार करण्यास परवानगी आहे.  हिंसाचारानंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. 

Last Updated : Nov 21, 2021, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.