मुंबई - राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट ‘भोंगा’च्या प्रदर्शनावरून राजकीय नाट्य घडताना दिसतंय. ‘भोंगा’ ३ मे २०२२ ला प्रदर्शित झाला आहे. मात्र मुंबई, पुणे, सातारा मधील काही चित्रपटगृहांमध्ये या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटावर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली असल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अमेय खोपकर यांच्या म्हणण्यानुसार राज्यसरकार हुकूमशहा सारखं वागतंय. त्यांनी ट्विट केलाय की, 'जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेला आहे, तो भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावणे हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं? राज्य सरकार हुकूमशहा सारखं वागतंय, भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावताहेत. पोलिसांना बेकायदेशीर काम करायला स्वतः गृहखातं सांगतय.'
-
राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
हेही वाचा : ...तर आम्ही हनुमान चालीसा वाजवणारच; राज ठाकरे ठाम, पाहा व्हिडिओ