ETV Bharat / city

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम बेगडी - भातखळकर - मुंबई लेटेस्ट न्यूज

आरेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम बेगडी असल्याची टीका केली आहे.

अतुल भातखळकर
अतुल भातखळकर
author img

By

Published : May 11, 2021, 4:07 PM IST

मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रो कारशेड आरेच्या परिसरात बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्थानिक आदिवासी आणि निसर्गप्रेमींनी या निर्णयाला विरोधा केल्यानंतर, कारशेडला स्थगिती देण्यात आली. मात्र राज्यात सत्ता परिवर्तन होताच महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडचा प्रकल्प इतरत्र हलवला, आणि आता आरेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून ही जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे, अशी टीका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम हे बोगस आणि बेगडी असल्याचे देखील यातून सिद्ध होत असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.

आरेमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असताना सुद्धा, ठाकरे सरकारने आरेमधील तब्बल 32310 वर्ग फुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला आहे. इतकेच नव्हे तर हा परिसर संवेदनशील क्षेत्र असताना सुद्धा केवळ आर्थिक हितसंबंधातून हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची टीका देखील यावेळी भातखळकर यांनी केली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम बेगडी

भाजपाचा आंदोलनाचा इशारा

मुंबईकरांना फायद्याचा असणारा मेट्रो कारशेड प्रकल्प खोटी कारणे देत, आरे येथून इतरत्र हलवून मुंबईकरांचे नुकसान केले, पण आता स्वतः सह बिल्डरांचा आर्थिक फायदा करण्यासाठीच ठाकरे सरकारचे आरेच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. याविरोधात भाजपा आंदोलन करणार असून, गरज पडल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील यावेळी भातखळकर यांनी दिला आहे.

हेही वाचा - म्यूकरमायकोसिस : डिस्चार्जपूर्वी तोंडाचा एक्स-रे गरजेचा; दंत शल्यचिकित्सकांचा सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.